• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अशक्य ते शक्य! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी; ५३ वर्षीय रुग्णाला नवजीवन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदेड | विशेष प्रतिनिधी

नांदेड येथील विष्णूपुरीस्थित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (GMCH) अत्यंत गुंतागुंतीची मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी करून पुन्हा एकदा शासकीय आरोग्य सेवेची गुणवत्ता अधोरेखित केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील ५३ वर्षीय रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत जोखमीची उपचार प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत त्यांना नवजीवन दिले.

RelatedPosts

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

दोन्ही किडन्या निकामी; जीव धोक्यात

रुग्णाची दोन्ही मूत्रपिंडे जवळपास निकामी झाली होती. एका किडनीचे कार्य ९० टक्क्यांपर्यंत बंद झाले होते, तर लघवीच्या मार्गातील अडथळ्यामुळे (Obstructive Uropathy) दोन्ही किडन्यांनी काम करणे थांबवले होते. शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांचा तातडीचा निर्णय ठरला जीवनदायी

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कन्नाके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागातील डॉक्टरांनी समन्वय साधून उपचार सुरू केले.

सर्वप्रथम किडनीविकार तज्ज्ञ डॉ. कपिल मोरे आणि डॉ. मोहन भंडारे यांनी रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यासाठी तातडीने डायलिसिस केले. त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. विद्यासागर केकळकर आणि डॉ. संदीप चव्हाण यांनी अत्यंत कौशल्याने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

विविध विभागांचा उत्कृष्ट समन्वय

उपचार प्रक्रियेदरम्यान मेडिसिन विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शीतल राठोड, डॉ. सूरज चव्हाण, डॉ. फलक रऊफ आणि डॉ. आकाश पवार यांनी आवश्यक तपासण्या व औषधोपचार केले. शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ज्ञ डॉ. देविदास बेंडेवाड, डॉ. आयुषी पायघन आणि डॉ. अभिजीत कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शासकीय रुग्णालयांची गुणवत्ता पुन्हा अधोरेखित

या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले की, “रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अशा प्रकारची जोखमीची शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात यशस्वी होणे हे येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य, आधुनिक सुविधा आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”

रुग्ण प्रकृतीत सुधारणा; नातेवाईकांकडून डॉक्टरांचे आभार

यशस्वी शस्त्रक्रिया आणि वेळेवर करण्यात आलेल्या डायलिसिसमुळे रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून ते आता धोक्याबाहेर आहेत. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला नवजीवन मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या यशस्वी उपचारामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि आधुनिक उपचार पद्धतींवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Ad 1
Previous Post

सच्चाई व माणुसकीचे दर्शन! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत; व्यापाऱ्याचा सत्कार

Next Post

मारेगाव-वणी महामार्गावरून अवैध दारू वाहतुकीचा संशय; नागरिकांकडून चौकशीची मागणी

Related Posts

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
Blog

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

October 18, 2026
4
विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा
Blog

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

October 18, 2026
15
Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
9
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
19
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
55
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
Next Post

मारेगाव-वणी महामार्गावरून अवैध दारू वाहतुकीचा संशय; नागरिकांकडून चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

October 18, 2026
मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In