• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात पुणे–बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या पुणे–बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारी बैठकीचे आयोजन अण्णासाहेब मगर महाविद्यालयात करण्यात आले.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी होणारी ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे होणार असून तेथून स्पर्धेला प्रारंभ होईल.

यावर्षी स्पर्धेचे दहावे वर्ष असून ती चार गटांमध्ये होणार आहे. यामध्ये पुणे ते बारामती (१२२ किमी) पुरुष राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा, सासवड ते बारामती (८५ किमी) खुली एमटीबी राज्यस्तरीय स्पर्धा, तसेच माळेगाव ते बारामती (१५ किमी) महिलांची राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पूर्वतयारी बैठकीस हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, डॉ. शंतनू जगदाळे, अमर तुपे, संतोष सरोदे, अजित घुले, फारूक इनामदार, ओंकार कामठे, भरत झांबरे, वैष्णवी सातव, सुजाता कटके, सोनाली घुले, शबाना शेख, वामन घाडगे, योगेश सूर्यवंशी, मनोज घुले, कलेश्वर घुले, संजय घुले यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार चेतन तुपे पाटील यांनी ही स्पर्धा हडपसरच्या नावलौकिकात भर घालणारी असून भविष्यात तिचा विस्तार जागतिक स्तरावर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी सांगितले की, या स्पर्धेत देशभरातील ४०० ते ४५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत. विजेत्यांना एकूण सहा लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास “घाटाचा राजा” हा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

याच दिवशी शनिवारवाडा ते हडपसर दरम्यान जनजागृतीपर सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता आणि वाहतूक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत ३,००० ते ३,५०० विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत मुळे यांनी केले, तर अमर तुपे यांनी आभार मानले.

Ad 1
Previous Post

शिक्षक वर्गात की सर्वेक्षणाच्या रस्त्यावर?

Next Post

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
1
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
1
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
12
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
1
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
0
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
0
Next Post

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In