वणी (यवतमाळ)—येथील निळापुर-ब्राम्हणी स्थित महामिनरल माईनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.ली.पिंपळगाव युनिट हि कंपनी बरेच दिवसापासून सुरळीत सुरू आहे.कंपनिने नियमित कामगारांना 1/10/24 पासुन आवश्यकतेनुसार वैकल्पिक ड्युटी देण्याचे फर्माण काढले आहे.परंतु हे फर्माण जनरल ईंडस्ट्रीज कामगार युनियन(आयटक)ला अमान्य आहे.कारण कंपनी प्रत्येक कामगारांना आवश्यकतेनुसार ड्युटी देईल.म्हणजे महीण्याला 15 दिवसच काम करावे लागेल.उरलेले 15 दिवस ईतर कोठेही काम करता येणार नाही.
त्यामुळे पगारावर परिणाम होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकणार नाही.करिता दि.1 आॅक्टों.24 मंगळवार स.11 वाजता युनियनने कंपणीसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.दिलेल्या निवेदनात
1)कामगारांची वैकल्पिक ड्युटीची अट त्वरीत रद्द करण्यात यावी.
2)कामगारांच्या पगारातुन कपात केलेला पि.एफ.त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा.
3)दिवाळी बोनस म्हणुन पुर्ण महीण्याचा एक पगार देण्यात यावा.या मागणीचा समावेश आहे.युनियनचे अध्यक्ष कॉ.अनिल घाटे,उपाध्यक्ष कॉ.राहुल काटकर,सचिव कॉ.आकाश खंगार,सहसचिव कॉ.मंगेश झिले,कोषाध्यक्ष कॉ.आदिल शेख यांचे नेत्रुत्वात शेकडो कामगारांनी आंदोलनात सहभाग घेतला.कंपनीने सुरू केलेल्या दडपशाही निर्णयाविरोधात कामबंद आंदोलनाची प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन न्याय द्यावा असे आवाहन आयटक युनियनने दिला आहे.
Discussion about this post