• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘वादळी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा; १३ सप्टेंबरला श्रीगोंदा येथे पुरस्कार वितरण सोहळा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
‘वादळी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा; १३ सप्टेंबरला श्रीगोंदा येथे पुरस्कार वितरण सोहळा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा :- प्रतिनिधी

RelatedPosts

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘वादळी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेच्या पंतनगर येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती साप्ताहिकाचे संपादक जितेंद्र पितळे यांनी दिली.
साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या तेरा वर्षांपासून विविध क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पाठीवर शाबासकीची थाप देण्याबरोबरच भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


यंदा सामाजिक, पत्रकारिता, कृषी, राजकीय, आध्यात्मिक, जाहिरात, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, प्रशासकीय आणि विधी क्षेत्रातील तब्बल ५० पुरस्कारार्थींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
विधी व प्रशासकीय क्षेत्रातील पुरस्कारार्थी
विधी क्षेत्रात ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. स्वाती आचार्य आणि ॲड. किशोर वाळुंज यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रशासकीय क्षेत्रात सेंट्रल बँकेच्या अहिल्यानगर येथील वरिष्ठ व्यवस्थापक उषा सुपनर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रीगोंदा उपविभागातील बहिर्जी शिंदे तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेचे हरिश्चंद्र ऊर्फ मधू दांडेकर आबा यांचा गौरव करण्यात येणार आहे.


उद्योग व वैद्यकीय क्षेत्रातही गौरव
उद्योग क्षेत्रात कुतवळ फूड्सचे चेअरमन प्रकाशशेठ कुतवळ, लोणी व्यंकनाथ येथील उद्योजक अजित काकडे आणि श्रीगोंदा येथील पुणेरी वडापावच्या विजयाताई लंके यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात दौंड येथील खवटे हॉस्पिटलचे डॉ. किरण खवटे, आनंद ऋषीजी हॉस्पिटल अहिल्यानगरचे डॉ. राहुल अग्रवाल, काष्टी येथील सिद्धिविनायक नेत्रालयाच्या डॉ. तेजस्विनी जयनेंद्र राहुड आणि अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटलचे डॉ. गणेश मैड यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच श्रीगोंदा फॅक्टरी येथील न्यूजपेपर एजंट सागर मोकाशी यांना ‘वादळी सन्मान विशेष सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


११ शिक्षकांचा विशेष सन्मान
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील ११ शिक्षक-शिक्षिकांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये मनीषा गायकवाड, जयश्री हराळ, वनिता जगताप, सुवर्णा काळे निंभोरे, संतोष इंगवले, सुवर्णा विठ्ठल वागस्कर, दिलीप पालवे, रमेश सुपेकर, संदीप रासकर, ईश्वर मोरे आणि प्रा. बाबुराव कांबळे यांचा समावेश आहे.
जाहिरात क्षेत्रात डॉ. अक्षयजी शेलार यांच्यासह नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-व्हाईस चेअरमन यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.


आध्यात्मिक क्षेत्रात पारनेर येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी साधना दीदी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
राजकीय, कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर
राजकीय क्षेत्रात श्रीगोंदा नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, दौंड नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे पाटील, दौंड नगरपरिषदेचे गटनेते योगेश प्रेमसुखजी कटारिया, श्रीगोंदा येथील भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय हिरणावळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामराव नागवडे यांचा गौरव होणार आहे.


कृषी क्षेत्रात नितीन वाबळे पाटील (म्हातारपिंपरी), निलेश नागवडे (वांगदरी) आणि भाऊसाहेब ऊर्फ संदीप डांगे (लोणी व्यंकनाथ) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात श्रीरंग साळवे (श्रीगोंदा), जावेद इनामदार (आढळगाव), दादा बारटक्के (दौंड) आणि राम सोनवणे (श्रीगोंदा) यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या केशवभाऊ मगर, डॉ. महेंद्र मुनोत, बुवा सावंत, विलास अण्णा वाघमारे, दादासाहेब जंगले आणि रामशेठ दावरा यांना ‘वादळी सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे कार्यकारी संपादक अजित पटवा, तसेच गणेश शेंडगे, आदिनाथ पाचपुते सर, बालाप्रसाद मंत्री, अनंता पवार, संतोष जठार, संतोष सुर्वे, महावीर पोखरणा, शिवाजी साळुंखे यांच्यासह संपादकीय मंडळातील सदस्य परिश्रम घेत आहेत.
१३ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषद सभागृह, पंतनगर येथे होणारा हा सन्मान सोहळा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post

नवी मुंबई रबाळे एमआयडीसीतील(R-823) एका फोम बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग.

Next Post

शिवानुभव मंडपासमोरील रस्ता आठ दिवसांपासून खड्ड्यात; भाविकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

Related Posts

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
Blog

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
7
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!
Blog

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
0
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला
Blog

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026
4
Blog

आचार्य टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 31, 2026
5
Blog

जळकोटच्या प्रथम महिला नगराध्यक्ष सौ. प्रभावती कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 31, 2026
6
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 31, 2026
13
Next Post
शिवानुभव मंडपासमोरील रस्ता आठ दिवसांपासून खड्ड्यात; भाविकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

शिवानुभव मंडपासमोरील रस्ता आठ दिवसांपासून खड्ड्यात; भाविकांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

ताज्या बातम्या

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In