• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
किनवटमध्ये पुन्हा ‘खर्रा’ मोकाट! कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

(प्रतिनिधी : शेख मोईन)

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

किनवट : राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनासह पोलिस यंत्रणेकडून काही काळ धडक कारवाई करण्यात आल्याने किनवट शहर व परिसरातील खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा जोर कमी झाल्याचे चित्र दिसत असून शहरातील अनेक भागांत पुन्हा खर्र्याची खुलेआम विक्री सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘कारवाई थंडावताच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांना पुन्हा मोकळे रान मिळाले का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानंतर त्याचे पडसाद किनवट शहरातही उमटले होते. त्याच काळात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून चंद्रशेखर कदम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या टीमने तसेच किनवट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या C-47 पथकाने प्रतिबंधित तंबाखूमिश्रित खर्रा, इतर तंबाखूजन्य पदार्थ, अवैध दारू, मटका आणि इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला होता.

या कारवायांमुळे शहरातील अनेक पान सेंटर काही काळ बंद राहिल्याचे दिसून आले होते. खर्रा विक्री तसेच निर्मितीशी संबंधित व्यावसायिकांमध्येही मोठी धावपळ उडाली होती. पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये काही काळ धाक निर्माण झाला होता.
मात्र, आता परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. शहरातील काही भागांत पान सेंटर तसेच इतर ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पुन्हा सुरू झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे, कारवाईचा धाक कमी होताच काही विक्रेते पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा वापर विशेषतः तरुणांमध्ये वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने केवळ अधूनमधून कारवाई न करता सातत्याने तपासणी व धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खर्रा विक्रीची ठिकाणे, निर्मिती करणारे आणि पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून पुन्हा व्यापक मोहीम राबविली जाणार का, तसेच शहरातील खर्रा विक्रीवर आळा घालण्यासाठी पुढील काळात कोणती पावले उचलली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन…

Next Post

*पावसाचा खंड अन् बळिराजा चिंतेत; मालेगाव परिसरात पिके पाण्याविना संकटात, बाजारपेठेतही मंदीचे सावट

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
1
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
1
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
10
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
1
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
0
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
0
Next Post

*पावसाचा खंड अन् बळिराजा चिंतेत; मालेगाव परिसरात पिके पाण्याविना संकटात, बाजारपेठेतही मंदीचे सावट

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In