• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
गुरचरण जमिनीत नीर्जा बिर्ला बंगल्यासाठी रस्ता; परवानगी कोणी दिली? प्रशासन गप्प का?
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

नवेधर कोलगावात कथित बेकायदेशीर काँक्रिटीकरणाचा ग्रामस्थांचा आरोप; पोलिस बंदोबस्तावरही सवाल

RelatedPosts

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

सारथी महाराष्ट्राचा न्यूज
रायगड जिल्हा प्रतिनिधी – अमोल काठे

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील नवेधर कोलगाव येथे गुरचरण जमिनीतून नीर्जा बिर्ला यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, गुरचरण जमिनीत अशा प्रकारचे रस्त्याचे काम करण्याची परवानगी नेमकी कोणी दिली? कोणत्या कायदेशीर आधारावर दिली? आणि संबंधित परवानगीची कागदपत्रे प्रशासन ग्रामस्थांसमोर का ठेवत नाही? असे थेट सवाल आता उपस्थित होत आहेत.

गुरचरण जमीन ही सार्वजनिक स्वरूपाची जमीन असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, त्या जमिनीतून खासगी बंगल्याकडे जाणारा रस्ता तयार करण्यास परवानगी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती प्रक्रिया पार पाडली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सामान्य ग्रामस्थांच्या जमिनीवर किंवा गावातील सार्वजनिक जागेवर कोणतेही काम करताना नियम-कायदे दाखवले जातात; मग खासगी बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या या कामासाठी कोणते नियम लागू केले गेले? प्रशासनाने याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी कामाबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलिस संरक्षण मागविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थांना संरक्षण की दबाव? असा सवालही उपस्थित झाला आहे. ग्रामस्थांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी असून, कोणत्याही दबावाला न जुमानता कामाची कायदेशीरता तपासावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पत्रकारांना फोटो व व्हिडिओ करण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या विषयाचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना घटनास्थळी छायाचित्रण करण्यास अडथळा का आणण्यात आला? पोलिसांना असे निर्देश कोणी दिले? याचेही उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रशासनासमोर ग्रामस्थांचे थेट सवाल

१. गुरचरण जमिनीत रस्ता करण्याची परवानगी कोणी दिली?
२. ही परवानगी कोणत्या कायद्यानुसार किंवा आदेशानुसार देण्यात आली?
३. संबंधित परवानगीची कागदपत्रे ग्रामस्थांना का दाखवली जात नाहीत?
४. सार्वजनिक/गुरचरण जमिनीवर खासगी बंगल्यासाठी काँक्रिटीकरण करण्यास नियम काय सांगतात?
५. कामाची परवानगी नसल्यास संबंधितांवर कारवाई कधी होणार?
६. ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर पोलिस संरक्षण का मागवण्यात आले?
७. पत्रकारांना फोटो व व्हिडिओ करण्यास नकार देण्याचे कारण काय?

या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने संयुक्त चौकशी करून रस्त्याच्या कामाची परवानगी, जमीन अभिलेख आणि संबंधित कागदपत्रे तपासावीत. नियमबाह्य काम आढळल्यास तात्काळ काम थांबवून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नवेधर कोलगावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

“कायद्याचा हात सर्वांसाठी समान आहे की श्रीमंतांसाठी वेगळा?” — आता प्रशासनाच्या उत्तराकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

Next Post

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

Related Posts

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.
Blog

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

September 3, 2026
0
Blog

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

September 3, 2026
0
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….
Blog

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

September 3, 2026
0
Blog

वाशी मनपा रुग्णालयात रुग्णाला मुदतबाह्य सलाईन लावल्याचा आरोप; प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये दाखल

September 3, 2026
6
Blog

ढगेवाडी फाटा येथे बिबट्याचा धुमाकूळ; कुबेर काळुगडे यांच्या चार शेळ्या ठार

September 3, 2026
2
Blog

महिला अर्बन बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांचे आजपासून उपोषण

September 3, 2026
3
Next Post

पांढरकवडा येथे शांतता समितीची बैठक; सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

प्रज्ञा प्रतिष्ठानच्या मोफत फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी.

September 3, 2026

नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सूचनेनंतर मोकाट वळूला पांजरपोळात सुरक्षित हलविले

September 3, 2026
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांची अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा बडगा…….

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In