
प्रतिनिधी : सतीश नेवारे
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
गोंडपिपरी : मूल तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे काका-पुतण्यामध्ये झालेल्या वादातून काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत भोजराज बांगरे (वय ३५) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग बांगरे (वय ६२) यांनी त्यांचे पुतणे भोजराज बांगरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात भोजराज जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बोंडाळा खुर्द परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पुढील कारवाई तसेच घटनेमागील नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.







