शहादा,दि.०३
प्रज्ञा प्रतिष्ठान शहादा यांच्या वतीने शहादा शहरात पहिल्यांदाच दोन दिवसीय मोफत फिजिओथेरपी (भौतिकोपचार) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ६५ रुग्णांची तपासणी व प्रत्यक्ष उपचार करण्यात आले..
या शिबिरामध्ये तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट डॉ. राजरत्न बळसाणे व डॉ. दुर्गेश जैन यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. उपचारांनंतर रुग्णांनी अत्यंत समाधानकारक प्रतिक्रिया दिल्या.या वेळी मनोगत व्यक्त करताना राजू शर्मा म्हणाले की, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी या आधुनिक पद्धतीचे थेरपी उपचार घेतले असून मला जागेवरच वेदनांपासून मोठा आराम मिळाला. अशा निष्णात डॉक्टरांची आणि उपचारांची शहराला नितांत गरज आहे.”शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बापूसाहेब इंदवे, अशोक जैन, अशोक पिंपळे, दादाभाई पिंपळे, संतोष कुवर, उत्तम महिरे, देविदास बिरारी, सुरेश साळुंखे, देवराम खैरनार, दीपक खैरनार, चंद्रसिंग सरदार, करिष्मा खैरनार, राजेंद्र पाटील, रीतेश कुंभार, ठगूबाई साळवे, अभि बलवान, आशाबाई बिरारी, सुनीता चित्ते, मंगला पाटील, वैशाली बडगुजर, ज्योतीबाई चौधरी, भारती पाटील, दिपाली पाटील, दीपिका कुंभारे, विलास निकम, प्रमोद बैसाणे, राजकमल पाटील, अनिता पाटील, कमलबाई जैन, दिनेश ज्ञानेश्वर मराठे, जितेंद्र बिरारे, रेखा मराठे आणि बापू महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दादाभाई पिंपळे यांनी केले, तर स्वागत व नोंदणीची जबाबदारी इंजि. रवींद्र आगळे यांनी सांभाळली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रितेश कुंभार, तौसिफ पठाण आणि पुष्कर जावरे यांनी परिश्रम घेतले.











