• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘गुलाबास लाजवी’ झाडीपट्टी गीताचे ५ सप्टेंबरला प्रसारण; संदेश भसारकर यांची निर्मिती

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

जिल्हा प्रतिनिधी : चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बोरगाव या गावाला कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या गावातून अनेक कलावंत घडले असून, झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि सामाजिक संदेश देण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.

RelatedPosts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

बोरगाव येथील निर्माता, गीतकार, गायक व कलावंत संदेश भसारकर यांच्या कलाकृतीतून साकारलेले ‘गुलाबास लाजवी’ हे झाडीपट्टी गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. गावाकडील वातावरणाचे सुंदर चित्रण आणि ग्रामीण जीवनाची अनुभूती या गीतातून मांडण्यात आली आहे. सामाजिक आशय व मनोरंजनाचा समतोल साधणाऱ्या या गीताला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या गीताची निर्मिती, गीतलेखन, गायन तसेच कलावंताची भूमिका संदेश भसारकर यांनी साकारली आहे. त्यांच्या सोबत सहकलाकार साक्षी धंदरे यांनी भूमिका केली आहे. गीताला संगीत अक्षय मेश्राम यांनी दिले आहे.

‘गुलाबास लाजवी’ या गीताचे चित्रीकरण सोमनाथ आणि मूल येथील पार्क परिसरात करण्यात आले असून, विश्वास आणि प्रशांत (ड्रीम स्टुडिओ, भंगाराम तळोधी) यांच्या टीमने चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे.

हे गीत ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ‘SANDESH BHASARKAR OFFICIAL’ या YouTube चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी गीताचा आनंद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला प्रतिसाद व आशीर्वाद द्यावा, असे आवाहन संदेश भसारकर यांनी केले आहे.

झाडीपट्टी कलेसोबतच सामाजिक क्षेत्रातही समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या या कलावंतांच्या पुढील वाटचालीसाठी रसिकांनी असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

डिजिटल पीक पाहणीचा नवा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी चिंताजनक; मुदतीत काम पूर्ण होणार की शेतकऱ्यांची अडवणूक करून खिसे गरम केले जाणार?

Next Post

जेष्ठ नेते अशोकराव लेंभे( आबा ) यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा..

Related Posts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक
Blog

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
0
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी
Blog

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
1
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!
Blog

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

September 3, 2026
0
जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.
Blog

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

September 3, 2026
7
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण
Blog

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

September 3, 2026
7
Next Post

जेष्ठ नेते अशोकराव लेंभे( आबा ) यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा..

ताज्या बातम्या

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In