(मिथुन महाजन पिंपोडे ) उत्तर कोरेगावातील ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव लेंभे आबा यांचा अमृत अमृत महोत्सवी सत्कार सोहळा दिनांक पाच रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता बाजार चौक पिंपोडे या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असून या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील, खासदार नितीन काका पाटील उपस्थित राहणार आहेत. पिंपोडे गेली चाळीस पंचे चाळीस वर्ष पिंपोड्याच्या राजकारण, सहकार, समाजकाराणात कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते आबा यांनी चाळीस वर्षांमध्ये,विविध पदांवर काम केले आहे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे चेअरमन पिंपोडे चे सरपंच,उपसरपंच पिंपोडे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन पंचायत समिती सदस्य, यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे स्कूल कमिटीचे सदस्य आधी पदांवर आबांनी काम केले आहे पिंपोडे च्या राजकीय पटलावर लोकाभिमुक कारभार केला आहे. अशा या नेतृत्वाचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे तरी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी आवाहन अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे समितीचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक श्री. रामभाऊ लेंभे साहेब, उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते सुरेश राव साळुंखे यांनी केले आहे










