• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डिजिटल पीक पाहणीचा नवा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी चिंताजनक; मुदतीत काम पूर्ण होणार की शेतकऱ्यांची अडवणूक करून खिसे गरम केले जाणार?

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
डिजिटल पीक पाहणीचा नवा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी चिंताजनक; मुदतीत काम पूर्ण होणार की शेतकऱ्यांची अडवणूक करून खिसे गरम केले जाणार?
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्यावर पिकांची अधिकृत नोंद होण्यासाठी ‘डिजिटल पीक पाहणी’ (Digital Crop Survey) करणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षीपर्यंत ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवीन माझा पीकपेरा’ या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून ही पीक पाहणी करण्याची मुभा होती. मात्र, यंदा केंद्र आणि राज्य शासनाने या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. यंदा शेतकऱ्यांचा हा हक्क काढून घेत महसूल विभागाने तलाठ्यांच्या देखरेखीखाली ‘पीक पाहणी सहाय्यकांची’ (कोतवाल, रोजगार सेवक इ.) नेमणूक केली आहे.
शासनाचा हा निर्णय कागदावर चांगला दिसत असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून, सहाय्यकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण आहे.

खरीप आणि रबी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने एक निश्चित मुदत दिली आहे. मात्र, राज्यात आधीच भ्रष्टाचाराने टोक गाठले असताना, हे खाजगी सहाय्यक दिलेल्या मानधनावर समाधानी राहून प्रामाणिकपणे काम करतील का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. हे सहाय्यक शासनाच्या मानधनावर विसंबून न राहता, शेतकऱ्यांची अडवणूक करू शकतात. पिकांची नोंद करण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करु शकतात .
त्याचबरोबर दिलेल्या मुदतीत सर्व शेतकऱ्यांची पीक पाहणी पूर्ण करतील का? याबद्दल मोठी शंका उपस्थित केली जात आहे.

आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांची होणारी नासाडी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पीक पाहणीची ही नवीन व्यवस्था शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते की वरदान, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुजोर आणि लाचखोर सहाय्यकांवर शासन वेळीच कडक कारवाई करणार का, याकडे आता राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी अडचणीत…

Next Post

‘गुलाबास लाजवी’ झाडीपट्टी गीताचे ५ सप्टेंबरला प्रसारण; संदेश भसारकर यांची निर्मिती

Related Posts

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक
Blog

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
0
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी
Blog

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026
2
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!
Blog

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

September 3, 2026
0
जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.
Blog

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

September 3, 2026
7
पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण
Blog

पाथर्डी तहसील येथे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष रामदास बर्डे यांचे उपोषण

September 3, 2026
7
Next Post

‘गुलाबास लाजवी’ झाडीपट्टी गीताचे ५ सप्टेंबरला प्रसारण; संदेश भसारकर यांची निर्मिती

ताज्या बातम्या

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

वडगाव मावळात ३१ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा आरोप; पोलीस प्रशिक्षणार्थीला अटक

September 3, 2026
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In