परभणी /प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत येथील श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाच्या मैदानावर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची १३१ वी जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण श्रीफळ फोडून उत्कृष्ट खेळाडू मुंजाभाऊ पानझाडे व राष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदकुमार नांदगावकर, मानवत स्पोर्ट्स अकादमीचे संचालक, क्रीडा शिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाले पाटील विद्यालयातील क्रीडा शिक्षक तथा तालुका क्रीडा संयोजक किशन भिसे यांनी प्रतिपादन केले की, “ध्यानचंद यांनी ३ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून भारताचे नाव जगात उंचावले. ४०० हून अधिक गोल करणाऱ्या या महापुरुषाकडून आजच्या पिढीने चिकाटी, शिस्त आणि देशभक्ती शिकली पाहिजे. हिटलरची ऑफर नाकारणारा तो खरा देशभक्त होता.”
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक आतकरे सर कोकरे सर व शिक्षकेतर कर्मचारी गायकवाड सर लहाने सर व इतर उपस्थित होते.










