प्रतिनिधी
अमोल पाठक
पाथर्डी
पाथर्डी नगरपरिषद हद्दीमधील प्लॉट नंबर 17 /5 /17 /6/ 71,72,76 धारकांनी नगरपरिषदेच्या ओपन स्पेस मध्ये अतिक्रमण केले आहे तसेच आरक्षित केलेल्या जागेमध्ये गुजराती ठेकेदाराने मनमानी पद्धतीने गटारीचे काम केले असून यांच्यावरती कार्यवाही होण्यासाठी निवेदन दिले होते निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे पाथर्डी तहसील येथे उपोषण सुरू केले आहे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन देऊन कळवले होते निवेदनाची कुठली दखल न घेतल्यामुळे आज रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून रामदास दशरथ बर्डे उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला शिवप्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ माने सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के उबेर आतार बाळासाहेब गिरी किरण फतपुरे अशोक माने यांनी जाहीर पाठिंबा दिला




