जत (प्रतिनिधी:- अरुण कोळी)जत येथील गड्डेपाटील मळ्यातील धनाजी वसंतराव काशीद यांच्या म्हैशीला नुकतीच दोन तोंडाचे रेडे जन्माला आले असून हे दोन तोंडाचे रेडे पाहण्यासाठी जत शहरासह तालुक्यातील लोक भेट देत आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक जत मार्केटयार्ड शाखेचे अधिकारी तानाजी काशीद यांचे बंधू धनाजी काशीद यांच्या म्हैसीने पहिल्यांदाच दोन तोंडाच्या रेडयांना जन्म दिला असून अशी घटना विरळच मानली जाते.
येथील पशुवैधकीय डॉक्टर राहुल टकले यांनी या म्हैशीची चांगल्याप्रकारे प्रसूती केल्याने म्हैस व तिचे नुकतेच जन्मलेले दोन तोंडाचे रेडे सुस्थितीत आहे.
धनाजी यांच्या म्हैशीची हही पहिलीच प्रसूती असून दोन तोंडाचे रेडे पाहण्यासाठी गड्डेपाटील मळ्यात लोकांची गर्दी होत आहे.



