• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
मुदत संपलेला पोषण आहाराचा मसाला रस्त्यावर!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

पाथरीत सुमारे ५० किलो पाकिटे उघड्यावर; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

पाथरी : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातील मसाला मुदत संपल्यानंतर चक्क रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पाथरी शहरात १ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. फायर ब्रिगेडसमोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कांदा-लसूण मसाल्याची पाकिटे आढळून आल्याने शालेय पोषण आहाराच्या साठवणूक व वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर शिक्षण विभागाची यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजुर्गे आणि पाथरीचे गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी अंदाजे ५० किलो मसाल्याची पाकिटे आढळून आली. संबंधित पाकिटांवरील मुदत जानेवारी/फेब्रुवारी २०२६ तसेच जुलैपर्यंत संपलेली असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेला हा साठा मुदत संपेपर्यंत नेमका कुठे होता, त्याची वेळोवेळी तपासणी झाली का, मुदत संपलेली पाकिटे शाळांमध्येच पडून होती का आणि अखेर ती रस्त्यावर कोणी आणून टाकली, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.


विशेष म्हणजे, मुदत संपलेला मसाला विद्यार्थ्यांच्या आहारात जाण्यापूर्वीच निकामी झाला की मुदत संपल्यानंतरही तो साठवून ठेवण्यात आला होता, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित योजनेतील साठ्याबाबत निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

३३ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

रस्त्यावर पोषण आहारातील मसाल्याची पाकिटे आढळून आल्यानंतर पाथरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने शहरातील ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक खुलासा न मिळाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

दोषींवर कारवाई प्रस्तावित : मुकेश राठोड

“रस्त्यावर पोषण आहाराची पाकिटे सापडणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला असून शहरातील संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल,” अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी दिली.

जबाबदारी निश्चित होणार का?
शालेय पोषण आहाराच्या साठवणुकीपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत वितरणापर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेवर या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मसाला मुदतबाह्य होईपर्यंत तो कुठे होता आणि मुदत संपल्यानंतर रस्त्यावर कसा पोहोचला? याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. केवळ घटनास्थळाची पाहणी आणि नोटिसांपुरते प्रकरण मर्यादित न ठेवता संबंधित साठा कुठून आला, कोणाच्या ताब्यात होता आणि तो रस्त्यावर कोणी टाकला, याची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Previous Post

जतमध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार, जत येथे म्हैशीला झाले दोन तोंडाचे रेडे.

Next Post

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

Related Posts

Blog

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

September 3, 2026
0
Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
1
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
1
Blog

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026
0
Blog

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
0
साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.
Blog

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

September 3, 2026
6
Next Post
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एमएसपी अंतर्गत कापूस विक्रीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी

ताज्या बातम्या

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

September 3, 2026

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In