• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

तालुका प्रतिनिधी : कुंदन तिवडकर

RelatedPosts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कार.

दैनिक सूर्यवार्ता,उपसंपादक, संघर्ष सातपुते छ.संभाजीनगर.

 'दैनिक सूर्यवार्ता' या लोकप्रिय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारे निर्भीड, अभ्यासू पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने (माहूर तालुका प्रतिनिधी) यांना दैनिक सूर्यवार्ता परिवारातील 'महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२६' देऊन सहकुटुंब विशेष सन्मानित करण्यात आले.
   मसिआ फंक्शन हॉल छ. संभाजीनगर (औरंगाबाद )येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि 'दैनिक सूर्यवार्ता'चे मुख्य संपादक प्रकाश सातपुते यांच्या हस्ते शाल, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मनोज किर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चळवळीतील विद्रोही कार्यकर्ता, सामाजिक नेतृत्व ते चौफेर अभ्यासू पत्रकार असा मनोज किर्तने यांचा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. माहूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणींना वाचा फोडणे,

शासकीय-प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच निर्भीडपणे लेखन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेऊनच त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या सोहळ्यास आ . प्रशांत बंब , जी.प.अध्यक्ष अविनाश गलांडे,उपजिल्हाधिकारी अरुण जराड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने मनपा प्रशासकीय अधिकारी संजय रगडे, छावणी प्रशासकीय अधिकारी वैशाली केनेकर, जे जे प्लस हॉस्पिटल चे संचालक डॉ. जीवन राजपूत, स. पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर,पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, मोहम्मद अयाजुद्दीन, शेख हादी भाई, रखमाजी जाधव पाटील, राजेंद्र दाते पाटील, एडवोकेट पद्माकर तांदूळजे, एडवोकेट बाळासाहेब मस्के, सुनील सोनवणे, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, ज्येष्ठ पत्रकार नारायण पूरकर, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, करण सिंग काकस, एम ए हजर यांचेसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. "किर्तने यांची अभ्यासू मांडणी आणि लेखणी ही राज्यातील तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी असून  प्रशासन व जनतेमधील सकारात्मक दुवा म्हणून त्यांचे अविरत कार्य चालू असल्याचे संपादक प्रकाश सातपुते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
 सत्काराला उत्तर देताना मनोज किर्तने यांनी हा सन्मान आपल्या वाचकवर्गाला, संपादक मंडळाला,सहकाऱ्यांना आणि पत्रकारितेतील मूल्यांना समर्पित केला. भविष्यातही माहूर तालुक्याच्या विकासासाठी व लोकहितासाठी संघर्षाबरोबरच आपली लेखणीही अशीच अविरतपणे चालत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या यशाबद्दल माहूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Post

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

Next Post

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

Related Posts

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान
Blog

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026
0
Blog

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026
1
Blog

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
0
Blog

लोणावळ्यात आई एकविरा देवी मंदिराच्या रोप-वे प्रकल्पाला तीव्र विरोध!

September 4, 2026
0
Blog

मारेगाव, नगरपंचायत चा काळाबाजार. कंत्राटदाराची फसवणूक

September 4, 2026
2
Blog

पोलिसांची अवध्य दारूवर कारवाई, आरोपीला पकडले रंगेहात………………………….

September 4, 2026
5
Next Post
विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

ताज्या बातम्या

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

मारवाडी समाजाकडून साईनाथ महाराजांचा सन्मान

September 4, 2026

लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा

September 4, 2026

🚨 लोणावळ्यात बंद बंगला फोडून १४ लाखांहून अधिकची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In