ग्रामस्थांकडून जंगी सत्कार येणेगूर (ता. उमरगा), तालुका प्रतिनिधी देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या वीर शहीदांच्या स्मृतींचा संदेश देत सायकलवरून देशभर भ्रमंती करणारे ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव यांचे येथे आगमन झाले. तब्बल २५ हजार किलोमीटरचा खडतर आणि प्रेरणादायी सायकल प्रवास पूर्ण करून गावात पोहोचलेल्या यादव यांचा येणेगूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने शाल फेटा श्रीफळ देऊन पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला.नरेंद्र यादव यांनी लडाखमधील ऐतिहासिक ‘रेजांगला’ येथून प्रवासाची सुरुवात केली होती. लडाख ते कन्याकुमारी आणि देशातील इतर दुर्गम भागांत सायकलवरून प्रवास करत त्यांनी जनतेमध्ये राष्ट्रप्रेम आणि शहीदांच्या त्यागाची भावना रुजवली आहे. २५ हजार किलोमीटरचा हा प्रवास केवळ वैयक्तिक विक्रम नसून, तो देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रसेवेचा एक जिवंत संदेश आहे, अशा भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.येणेगूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण कांबळे यांनी केले. त्यांनी यादव यांच्या धाडसी यात्रेचे कौतुक करून प्रशासनाच्या वतीने त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास उपसरपंच श्री. संदीप बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गायकवाड, मल्लिकार्जुन तरमोडे, अरुण बिराजदार, कर्मचारी खुर्शीद येळीकर सचिन दूधभाते अमीर शेख विजयकुमार घंटे ज्येष्ठ नागरिक मल्लिनाथ पाटील, योगीराज स्वामी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी करण्यात आला.+



