मुदाळ :
मुदाळ गावात आज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले.
मूर्तीचे आगमन होताच स्थानिक भक्तांनी ‘श्री स्वामी समर्थ’ आणि ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. फुलांनी सजवलेल्या पालखीमधून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून, औक्षण करून स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यात आले. टाळ मृदुगाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.
मूर्तीची गावातून मिरवणुक काढून मूर्ती स्वामी समर्थांच्या नवीन बांधलेल्या मंदिरासमोर आणून ठेवण्यात आली.भाविकांनी जोरात नामस्मरण करून दर्शन घेतले व त्यानंतर गावातील महिलांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. स्वामींच्या या आगमनामुळे मुदाळ गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.यावेळी उद्या मूर्तीची प्रतिष्ठापना असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
सारथी महाराष्ट्राचा
पत्रकार- सुनील पाटील (नयन).



