तक्रार अर्ज
प्रति,
मा. गटविकास अधिकारी पं.स. पातूर,
ता. पातूर जि. अकोला.
विषयः- केल्याबाबत.
प्रमोद डोंगरे
तालुका प्रतिनिधी पातुर मा. महोदय,
उरोक्त विषयाला अनुसरून, माहिती देतो की, गट ग्रा.प. बोडखा (चिं) येथे घरकुल PMAY-G योजनेमध्ये निवड प्रक्रिया करत असताना प्रथमतः ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी स्वतच्या घरातील व जवळचे नातेवाईक आणि ज्या नागरिकांचे वाळू, सीमेंट, फर्शी, स्लॅब आदि चे पक्के बांधलेले घरे असूनसुद्धा आर्थिक देवाण घेवाण करून यापूर्वी ज्या परिवारात वारंवार लाभ मिळालेल्या नागरिकाना समाविष्ट केलेल आहे. त्यामुळे शासकीय घरकुल योजनेचा लाभगावातील असे अनेक नागरिक आहेत. की, ज्यांना घरकुलची अत्यंत गरज आहे व त्यांना पिढ्यान पिढ्या आतापर्यंत कधीही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा लोकाना घरकुल योजनेपासून वंचित ठेवून ठेऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे. तरी आपण तात्काळ प्रसिद्ध झालेली PMAY-G घरकुल यादी रद्द करावी आणि पारदर्शक सर्वे करून नविन यादी तयार करावी अन्यथा शिवसेना अकोला जिल्हा च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. करीत सविनय अर्ज सादर.



