मारवाडी समाज बंधू भगिनी भगिनींनी घेतला अष्ट पारा कीर्तनाचा लाभ
श्रीक्षेत्र माहूर
माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम सर्वधर्म समभावाची जोपासना करणारे आश्रम म्हणून देशभरात प्रसिद्ध झाल्याने तसेच अष्ट पारा कीर्तन कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्याने माहूर येथील मारवाडी समाजाच्या बंधूभगिनी कडून अष्टपारा कीर्तनाचा लाभ अन्नदान ग्रहण करत सर्वधर्मसमभावाची जोपासना करणारे महाराष्ट्र राज्य स्वच्छता दूत आयटीआय चे मार्गदर्शक द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचा हृदय सत्कार केला
श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्व समाज बांधवासह ब्राह्मण मारवाडी समाज बांधवांसाठी सहकुटुंब, सहपरिवार स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्रावण मास हा धार्मिक आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाने परिपूर्ण असा पवित्र महिना आहे. या पावन पर्वाचे औचित्य साधून मानव जातीतील सर्व बांधवांमध्ये स्नेह आपुलकी व एकोपा वृद्धिंगत व्हावा तसेच सर्व कुटुंबीयांनी एकत्रित येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत या मंगल भावनेतून श्री आनंद दत्तधाम आश्रमांकडून श्रावण महिनाभर पवित्र अन्नदान दत्त नाम सप्ताह अष्टपारा यासह इतर धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
या कार्यक्रमानिमित्त सर्व समाज बांधवांना आमंत्रित केले जाते म्हणून मारवाडी महासंघ समाज बांधव महिला भगिनी कडून अष्टपरा कीर्तनाचा लाभ घेवून अन्नदान ग्रहण झाल्यानंतर राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचा बंधू भगिनी कडून हृदय सत्कार करण्यात आला यावेळी मारवाडी समाजाचे गौतम मेहता
चंपालाल मेहता गणेश जोशी खुशाल मेहता सौ प्रमिला जोशी सौ नीलम मेहता सौ ललिता मेहता यांचे सह समाजाचे मान्यवर उपस्थित होते



