जत /प्रतिनिधी. अरुण कोळी
सभापती सौ अर्चना ताई पाटील यांचे स्टिंग ऑपरेशन
.म्हैशाळ योजना नियोजन उपविभाग जत.मृद व जलसंधारण उपविभाग पाटबंधारे शाखा जत येथील कर्मचारी बेपत्ता एकीकडे जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ उपविभाग अभियंता म्हैसाळ योजना नियोजन उपविभाग जत मृद व जलसंधारण येथील कर्मचारी व काही अधिकारी गायब असल्याचे निदर्शनास आले संबंधित कार्यालयात हलचाल रजिस्टर व हजेरी रजिस्टर नसल्याचे निदर्शनास आले.सभापती सौ अर्चना ताई पाटील व युवा नेते नाथा पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच खरडपटी केली सभापती सौ अर्चना ताई पाटील यांच्या स्टिंग ऑपरेशन मुळे कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे.









