वडगाव मावळ | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी बाळू नामदेव आसवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान टाकवे बुद्रुक गावातील एचडीएफसी बँकेजवळील लंबोदर दूध डेअरी येथे ही घटना घडल्याचा आरोप आहे. आरोपीने बालिका अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडित बालिकेच्या २५ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७७/२०२�









