• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत बुर्गी येथील पैमा या गावात क्रेच केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात

Pratik Tidke by Pratik Tidke
September 4, 2026
in Blog
0
ग्रामपंचायत बुर्गी येथील पैमा या गावात क्रेच केंद्राचा उद्घाटन समारंभ उत्साहात
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

टाटा ट्रस्ट्स व मोबाईल क्रेचेसच्या पुढाकारातून बालकांच्या पोषण, संगोपन व विकासासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ४ सप्टेंबर २०२६

बुर्गी : ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना पोषणयुक्त, सुरक्षित, प्रेमळ आणि गुणवत्तापूर्ण बालसंगोपन व विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा ट्रस्ट्स आणि मोबाईल क्रेचेस यांच्या सहकार्याने “पोषण, संगोपन आणि सक्षमीकरण : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील प्रारंभिक बालविकास उपक्रम” राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील पैमा येथे क्रेच केंद्राचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला.

“आजची सुदृढ व सुपोषित बालके, उद्याचा सक्षम समाज!” या संदेशातून बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना दर्जेदार पोषण, आरोग्य सेवा तसेच सुरक्षित आणि आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एटापल्ली तालुक्यात ७ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी चार क्रेच केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

सन १९७३ पासून सामाजिक परिवर्तन व विकासासाठी कार्यरत असलेल्या टाटा ट्रस्ट्सच्या सामाजिक बांधिलकीला, तसेच सन १९९९ पासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या मोबाईल क्रेचेस संस्थेच्या अनुभवाला स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याची जोड मिळाल्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारत आहे.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला श्री. अविश्यांत पांडा (IAS), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गडचिरोली, तसेच श्रीमती जयिता चौधरी, पोषण विभाग प्रमुख, टाटा ट्रस्ट्स, श्रीमती सुमित्रा मिश्रा,मोबाईल क्रेचेस, सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली, अमर राऊत, SDM एटापल्ली, हेमंत गांगुर्डे, तहसीलदार एटापल्ली यांच्यासह जिल्हा व तालुका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी पैमा येथील पोलीस पाटील लुलाजी तलांडी, दानू तलांडी, कोलू तलांडी, कल्पना तलांडी, इमला तलांडी, पिली आत्राम, सुगत उराडे, बुर्गी, विनोद हिचामी, बुर्गी, साई पुंगाटी, अमराज पुंगाटी,मुन्ना पुंगाटी, सरपंच जवेली खुर्द, ललिता मडावी, सरपंच येमली, पी.ओ. ओंडर सर, जि.प. शाळा मुख्याध्यापक पैमा, आर. धुर्वे मॅडम, सचिव ग्रामपंचायत बुर्गी, नीता खोब्रागडे, अंगणवाडी सेविका पैमा, प्रीती तलांडी, अंगणवाडी मदतनीस पैमा यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

“बालपण जपुया… बालविकास घडवूया… उज्ज्वल भविष्य घडवूया!” या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे क्रेच केंद्र दुर्गम भागातील लहान बालकांच्या आरोग्य, पोषण आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

वडगाव मावळात अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ५१ वर्षीय आरोपी अटकेत

Next Post

कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
4
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
4
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
1
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
1
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
2
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
6
Next Post
कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

कै.सौ. कमलताई जामकर यांच्या जयंती निमित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In