अतिक्रमणांवर धडक कारवाईची मुरुड मधील नागरिकांची मागणी…
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी बाजीराव चौरे :-
मुरुड:- मुरुड शहरातून जाणारा नवीन महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून जवळ जवळ सर्वच दुकानदार आपल्या राजकीय लागेबांध्यामुळे रस्त्यावर अगदी डांबरी करणापर्यन्त आपला माल ठेऊन पुन्हा नागरिकांना दमदाटी करत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करताना दिसत आहे. मुरुड शहरातील हे झालेलं अतिक्रमण हटवावं अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.









