करमाळा -प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज करमाळा येथे मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत करमाळा येथील करमाळा अहिल्यानगर बायपास बायपास हायवे देवीचा माळ रोड या ठिकाणी धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे”, “मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या मान्य करा” अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त तैनात केला.
आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. मनोज जरांगे-पाटील









