अंदरसुल, सुनिल गायकवाड
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ सजन गुरुजी, अमोल सोनवणे (सरचिटणीस – अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ), सौ. विनिता अमोल सोनवणे (माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या – अंदरसूल ग्रामपालिका) तर अध्यक्षस्थानी प्रा. आर. बी. गायकवाड (संचालक तथा प्रशासकीय अधिकारी – अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ) हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण प्रतिमा,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण प्रतिमा व सहकार महर्षी स्व.गोविंदराव नाना सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.सदर शिक्षक दिन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारल्या त्यात प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी साई सोनवणे, प्रिन्सिपल विद्यार्थी ईशान देशमुख, इन्चार्ज शिक्षक विद्यार्थी आयुष राऊत, तन्मय सोनवणे, कांचन देवरे, श्वेता सोनवणे, प्रतीक्षा देशमुख, राजेंद्र सोनवणे, निखिल भागवत
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजहर खतीब सर व वैष्णवी पाराटे यांनी केले. यावेळी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी ‘कृष्ण जन्मला’ या गीतावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी ‘वो कृष्णा है’ या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जानवी देशमुख व शिवांजली जगताप यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे केली. प्रमुख पाहुणे हरिभाऊ जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. आर. बी. गायकवाड यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
सदर कार्यक्रमास रामनाथ काका एंडाईत, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, राजेश कांबळे, सुशांत निकम, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, नीलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनीता वडे, धनश्री कलांगे, पायल परदेशी, खुशी वाडेकर सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत दही हंडीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. सदर दही हंडी इ.10वीच्या विद्यार्थ्यांनी फोडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी अक्षदा खैरनार व जानवी सौंदाणे यांनी केले, तर वैष्णवी पाराटे हिने आभार प्रदर्शन केले.
शिक्षक दिनासोबतच दहीहंडी उत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते.










