गोविंदपूर / प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे दि. ५सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच श्री आशोक मस्के उपसरपंच संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षीकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विष्णू मुंडे, ज्योतीराम कोकाटे, धनंजय माळी, संजय बिडवे, नानासाहेब मुंडे, सौदागर मुंडे, बालाजी सुरवसे, गणेश सौदागर, उपस्थित होते.
अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वसंत इंगळे यांनी केले. तर श्री संजय भालेराव यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कनकवाड हनमंलु, शिक्षक संजय भालेराव, गोविंद गोरे,वसंत इंगळे, गणपती तपिसे,शिक्षिका मनिषा कदम,अनिता आनेराव, मंजुषा घोळवे, वैशाली बांगर, पौर्णिमा मुधोळकर, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










