• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण

Pratik Tidke by Pratik Tidke
September 5, 2026
in Blog
0
पहाडसिंगी येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन-पठण सुरू; १४ वर्षीय विद्यार्थ्याचे वाचन ठरतेय आकर्षण
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पातूर ग्रामीण (प्रतिनिधी) |

RelatedPosts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

पातूर तालुक्यातील पहाडसिंगी या छोट्याशा गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्म जागृतीचा आगळा उपक्रम सुरू झाला आहे. गौतमी महिला मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त पुढाकाराने धम्मशील बुद्ध विहारात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन-पठण मोठ्या श्रद्धेने सुरू करण्यात आले आहे.

दररोज सायंकाळी ठीक ८ वाजता सार्वजनिक पंचशील, त्रिशरण व वंदना ग्रहण करून या ग्रंथ वाचनाला सुरुवात होते. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे या ग्रंथाचे मुख्य वाचन इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा १४ वर्षीय करण दीपक सरकटे हा विद्यार्थी करतो. त्याच्या सुस्पष्ट वाचनाने उपस्थितांची मने जिंकली आहेत. तर ग्रंथातील गहन विषयाचा सारांश सुभाष सरकटे हे सोप्या भाषेत समजावून सांगतात. राहुल गवई आणि सुनील सरकटे हे ग्रंथाचे पठण करतात.

गौतमी महिला मंडळ व पंचशील मित्र मंडळातील उपासक-उपासिका मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि श्रद्धेने दररोज या धम्म वाणीचा लाभ घेत आहेत. गावात धम्ममय वातावरण निर्माण झाले आहे.

मान्यवरांची सदिच्छा भेट

दरम्यान भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धम्मशील बुद्ध विहाराला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुपाजी अंभोरे सर (सुकळी), जगदेव अंभोरे, कैलास कांबळे, सुधाकर अंभोरे, बाळकृष्ण अंभोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक वंदना घेण्यात आली.

याप्रसंगी धम्म उपासक सुपाजी अंभोरे सर यांनी ‘धम्म कल्याण मित्र व धम्माप्रती श्रद्धा’ या विषयावर अत्यंत प्रभावी व महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले. सामाजिक कार्यकर्ते जगदेव अंभोरे यांनी ‘दान पारमिता’ या विषयावर, तर कैलास कांबळे यांनी धम्माप्रती आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गौतमी महिला मंडळ व पंचशील मित्र मंडळाच्या अथक परिश्रमामुळे पहाडसिंगी गावात धम्म चळवळ अखंडपणे सुरू असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous Post

कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि डोईजड यांनी धडक कारवाई करत ; चार पान टपऱ्यांवरून १२२ माव्याच्या पुड्या जप्त……

Next Post

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

Related Posts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
Blog

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
4
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
27
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
2
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
1
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
8
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
6
Next Post
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

'माफदा' (MAFDA - महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In