गुडाळवाडी, ता. राधानगरी : राधानगरी तालुक्यातील विद्या मंदिर गुडाळवाडी या शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, गाणी आणि विविध उपक्रमांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी एकत्र येत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा उत्सव जल्लोषात साजरा केला.
या कार्यक्रमाचे नियोजन पाटील सर, मोरे मॅडम व भोई मॅडम यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सहकार्याची भावना आणि सांस्कृतिक परंपरांविषयीची आवड निर्माण होण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.










