• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
“गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन खारपाडा तर्फे खरोशी गावात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप”
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण

गुंज सामाजिक संस्था( दिल्ली) व महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील खरोशी गावातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. 5 ते 7 जुलै 2026 रोजी झालेल्या महापुरात या ग्रामस्थांच्या घरांमध्ये 5 ते 6 फूट पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले होते. त्या नागरिकांना एक छोटीशी मदत म्हणून सामाजिक बांधिलकी जपत गुंज सामाजिक संस्था रायगड जिल्हा समन्वयक श्री आनंद खरे सर व सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी या पूरग्रस्त गावात जाऊन पुरात बुडलेल्या घरांची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या आणि आज त्याची पूर्तता केली
गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे उपक्रम:-

RelatedPosts

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, या सामाजिक भावनेतून हे सामाजिक बांधिलकी जपत हे कार्य गेली 28 वर्षे गुंज सामाजिक संस्था करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत(पूरग्रस्त, दरडग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप), मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांगीण विकासासाठी, स्वावलंबन, शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी भागात सामाजिक सहभागातून लोकसहभागातून “पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेतून” बंधारा बांधणे, सामाजिक वनीकरण- झाडे लावा, झाडे जगवा!, गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणी पुरवठा पाणवठे निर्माण करणे, वन बंधारे बांधणे, पुरात वाहून गेलेले रस्ते मातीचा भराव टाकून तयार करणे. विहिरी मधील गाळ काढणे, लोक सहभागातून सहकार्यातून शेतीची बांधबंदिस्ती काढणे, फळबाग, भाजीपाला लागवड करणे, महिला सक्षमीकरण, युवक कौशल्य विकास, व्यसनमुक्ती, विविध उपक्रम कार्यान्वित करणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पेण तालुक्यातील खरोशी येथील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या बॅगच्या किटचे वाटप करण्यात आले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती व स्वागत समारंभ:-
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकधारा वृत्तपत्र व न्यूज चॅनलचे संपादक श्री विजय गायकर साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक कार्यकर्ते तथा इंचगिरी संप्रदायाचे कोंकण विभाग सचिव ह.भ.प.कृष्णा वर्तक सर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उत्तम यशस्वी आयोजन व नियोजन:-
हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी खरोशी गावाचे सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील यांनी पुढाकार घेऊन, युवा कार्यकर्ते धीरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितेश पाटील, गावपंच रमेश घरत, युवा वर्ग सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी खरोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ग्रामस्थांचे श्रमदान व वृक्षारोपण:- पत्रकार कैलासराजे घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भूषण पाटील यांच्या अथक परिश्रमाने खरोशी ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन पुरामुळे रस्त्यात पडलेले खड्डे बुजवले, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड करण्यात आली. लोकसभागातून परसबाग फुलविली. दरड कोसळलेल्या जागेवरची माती दगड काढून तो भाग मोकळा व सुरक्षित केला. सामाजिक ऐक्याचा संदेश देत, संकटात एकत्र येऊन माणुसकीचा वसा जोपासला.

सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांचे पूरग्रस्त नागरिकांना मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन:-
यावेळी युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करून गुंज सामाजिक संस्था व युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशन सातत्याने अनेक समाजपयोगी शैक्षणिक उपक्रम राबवित असून आजचा उपक्रम त्याचाच एक भाग असून यापुढेही आपल्या सहकार्यातून खरोशी गावात सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. असेच सहकार्य यापुढेही लाभत राहो अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. खरोशी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांकडून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सर्वांच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला.

Previous Post

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

Next Post

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

Related Posts

Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
0
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
0
Blog

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026
2
पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!
Blog

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

September 12, 2026
5
लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.
Blog

लोहा शहर व परिसरात पोळा उत्साहात साजरा; ४ अधिकारी २३ कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त.

September 12, 2026
4
कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.
Blog

कलासक्त ची धुडकुस रंगणार गोविंदराव टेंबे रंगमंच. देवलं क्लब येथे.

September 12, 2026
1
Next Post
पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरणाला न्यायालयीन दणका!

ताज्या बातम्या

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026

दौंड शहरात बेकायदेशीर ऑनलाईन कसिनो आणि जुगाराचे रॅकेट सक्रिय; काही स्थानिक एजंट्सकडून तरुणांची फसवणूक

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In