शिरोळ प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे येडेश्वरी माता नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटा मध्ये चालू आहे या येडेश्वरी जवळ दररोज सकाळ संध्याकाळ आरती केली जाते मोठ्या भक्ती भावाने जिजाऊ चौक लातूर रोड येथे हा उत्सव बऱ्याच दिवसापासून चालू आहे या कार्यक्रमाला गावातील लहान तरुण मंडळी व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा येडेश्वरीचा नवरात्र उत्सव साजरा करतात या येडाईची पुजारी सौ.मंजुश्री बाबुराव धडे हे भक्तिभावाने येडेश्वरी ची पूजा करतात तसेच येथे दररोज रात्री येडेश्वरी आराधी मेळा कार्यक्रम केला जातो येडेश्वरी ची मूर्ती जशी येरमाळ्याला आहे त्याच रूपामध्ये या ठिकाणी सुद्धा आहे या येडेश्वरी चा कार्यक्रम दर अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार भक्ती भवानी आराधी मंडळ करतात.











