गेली कित्येक वर्षे गणपती विसर्जनाच्या वेळी रेवा गणपती पाटाची लेव्हल करून गणपती बसवावा लागत होता. मात्र यावर्षी गणपती बसवण्यासाठी बंधारा तयार करण्यात आला, ही आपल्या वाडीसाठी निश्चितच कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे👏🏻
या कामासाठी ग्रामपंचायतीकडून निधी आणण्यापासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत सर्वस्वी पुढाकार आणि पाठपुरावा करणारे श्री. अजित बा. भुवड यांचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार 💐🙏🏻
तसेच या कामासाठी प्रत्यक्ष श्रमदान व सहकार्य करणाऱ्या वाडीतील गावी उपस्थित स्थानिक महिला व पुरुष वर्गाचेही मनःपूर्वक आभार 🙏🏻तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळेच हे काम प्रत्यक्षात साकार झाले 🙏🏻
निधी आणण्यापासून ते काम पूर्ण करण्यापर्यंत घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे, आपल्या मेहनतीला सलाम 🫡
वाडीतील असेच सकारात्मक आणि विकासात्मक बदल यापुढेही एकजुटीने करत राहूया, हीच मनापासून विनंती🙏🏻
श्री. अजित बा. भुवड तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व महिला व पुरुष बांधवांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻💐











