आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व वाघेरा आश्रमशाळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२६-२७’ अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्या.
मा. विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष अनुदानित आश्रम शाळा वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील प्रांगणात दिनांक १३/१०/२०२६ ते १५/१०/२०२६ या कालावधीत मा. अर्पिता ठुबे (भा. प्र. से.) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली
मा.सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र महाले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण विस्तार अधिकारी अंबादास बागूल, वाघेरा गावचे सरपंच दिलीप खेडुलकर , कोणे गावचे सरपंच दत्तू उदार, सर्व शाळांचे मुख्याध्यापक , अधीक्षक, क्रीडाशिक्षक, संघ व्यवस्थापक, यांच्या उपस्थितीत या रोमांचक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवात 14,17, व 19 वयोगटातील मुले आणि मुली यांनी अत्यंत जिद्दीने, खिलाडू वृत्तीने आणि अभूतपूर्व उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध खेळप्रकारांमध्ये आपल्या चमकदार कौशल्याचे प्रदर्शन करत खेळाडूंनी उपस्थितांची मने जिंकली. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक प्रकल्पातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील नऊ शासकीय आश्रम शाळा तसेच अकरा अनुदानित आश्रम शाळेच्या 1600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
अटीतटीच्या व रंगतदार झालेल्या या स्पर्धेच्या निकालानुसार, विविध खेळप्रकारांमध्ये विजयी संघ व खेळाडूंची यशस्वी कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
क्रीडा स्पर्धा निकाल २०२६-२७ * खो – खो मुले
- १९ वर्ष वयोगट: विजेता – बोरीपाडा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – शिरसगाव,
- १४ वर्ष वयोगट: विजेता – शिरसगाव,
*खो – खो मुली - १९ वर्ष वयोगट: विजेता – रायते,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – वेळुंजे
- १४ वर्ष वयोगट: विजेता – पिंप्री, कब्बडी मुले
- १९ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
१४ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
कब्बडी मुली - १९ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – वेळुंजे
- १४ वर्ष वयोगट: विजेता – वेळुंजे,
- व्हॉलीबॉल मुले
- १९ वर्ष वयोगट: विजेता – बोरीपाडा
- १७ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १४ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- व्हॉलीबॉल मुली
- १९ वर्ष वयोगट: विजेता – बोरीपाडा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – बोरीपाडा,
- १४ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- हँडबॉल मुले
- १९ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १४ वर्ष वयोगट: विजेता – तोरंगण,
- हँडबॉल मुली
- १९ वर्ष वयोगट: विजेता – वाघेरा,
- १७ वर्ष वयोगट: विजेता – तोरंगण,
- १४ वर्ष वयोगट: विजेता – तोरंगण,
- वैयक्तिक क्रीडाप्रकारातील सर्व विजयी खेळाडू व
- वरील सर्व संघांची निवड प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. विजयी संघ व खेळाडू यांना श्री. प्रदीप विशे (सहा.प्रकल्प अधिकारी), श्री. हर्षवर्धन नाईक (सहा. प्रकल्प अधिकारी), श्रीम. लता चव्हाण (सहा. प्रकल्प अधिकारी), श्री. पंकज बुरकूले (सहा. प्रकल्प अधिकारी), श्री. संदिप चंदनशिवे (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या भव्य आणि प्रेरणादायी क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी व उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, समर्पित शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच सर्व संयोजक व नियोजन समिती, केंद्रातील क्रीडा शिक्षक, संघ व्यवस्थापक,अधीक्षक, अधिक्षिका,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे आणि महत्त्वाचे सहकार्य लाभले….





