• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देणारं की, अजूनही विमा कंपनीच हित बघणार? विम्या संदर्भात आयोजीत बैठकीनंतर आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

धाराशिव ता. 15: सद्या शेतकरी अभूतपूर्व अश्या संकट काळात आहे, दिवसे दिवस मरणासन्न अवस्थेतून शेतकरी जात आहे. मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्यांना सरकार आतातरी न्याय देणारं की दरवेळी प्रमाण कंपनीचा फायदा बघणार हे आता स्पष्ट होणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हंटले आहे.

RelatedPosts

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीने संताप; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आक्रमक

हिवरखेड मार्गावर टिपरचा अपघात; जीवितहानी नाही, चालक फरार

मंत्रालय मुंबई येथे (ता. 15) रोजी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. त्यांनतर कैलास पाटील यांनी सरकार काय भूमिका घेणार याकड लक्ष वेधले आहे. 2025 च्या खरीप पिकां बाबतीत धाराशिव जिल्ह्यातील वगळलेल्या 14 महसूल मंडळासंदर्भात तसेच कमी नुकसान भरपाई दिलेल्या महसूल मंडळासंदर्भात चर्चा झाली.

राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून पीक कापणी प्रयोगाद्वारे 50 टक्के तर तांत्रिक उत्पादनाच्या आधारे 50 टक्के पीक विमा देण्याचे धोरण अवलंबले आहे. गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ नुकसान झाले होते. मात्र विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देताना 57 पैकी केवळ 43 महसूल मंडळाला पीक नुकसान भरपाई देऊन जिल्ह्यातील 14 महसूल मंडळाला वंचित ठेवले. तर काही मंडळांना अतिशय कमी भरपाई देऊन अन्याय केला होता. यासंदर्भात आमदार कैलास पाटील यांनी संबधित यंत्रणेकडे 4 ऑगस्ट रोजी तक्रार (अपिल) दाखल केली. शिवाय 15 ऑगस्ट व 30 सप्टेंबर अशी दोनवेळा स्मरण पत्र सरकारला पाठवले. तरीही सरकार याबाबत संवेदनशील नव्हते आता उशिरा का होईना बैठक लावून सरकारला शहाणपण सुचले आहे. किमान त्यानुसार आता शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबतीतही सरकार संवेदनशील राहील का असा सवालही आमदार कैलास पाटील यांनी सरकारला विचारला आहे.

Ad 1
Previous Post

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

Next Post

विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Blog

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीने संताप; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आक्रमक

October 16, 2026
4
Blog

हिवरखेड मार्गावर टिपरचा अपघात; जीवितहानी नाही, चालक फरार

October 16, 2026
5
Blog

अंगणवाडी मदतनीस भरतीत कथित अनियमितता!

October 16, 2026
7
Blog

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोघांना अटक

October 16, 2026
18
Blog

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

October 16, 2026
9
Next Post
विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान

विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान

ताज्या बातम्या

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026

नशिराबाद टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीने संताप; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आक्रमक

October 16, 2026

हिवरखेड मार्गावर टिपरचा अपघात; जीवितहानी नाही, चालक फरार

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In