सांगली | पुणे पदवीधर 2026
जत, दि. 16/10/2026 (प्रतिनिधी – अरुण कोळी) – पुणे पदवीधर मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ सांगली येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याला शिवसेनेचे सचिव, खासदार माननीय विनायक राऊत साहेब आणि मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नियोजन: या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील सर, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख माननीय कुंजीर पाटील साहेब, शिवसेना नेत्या छायाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शंभुराजे काटकर, संजय काटे, विशाल रजपूत, अभिजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
जत तालुक्यातून उपस्थिती: जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव, तालुकाप्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ, उपजिल्हाप्रमुख रमेश कदम, ज्येष्ठ नेते इराण्णा पाचंगे, कोळीगीरीचे स्वामी महाराज, महिला आघाडीच्या शब्बाना अराज, अनिताताई चव्हाण, शहर प्रमुख सविता माळी व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सांगली जिल्हा संपर्क प्रमुख कुंजीर पाटील यांच्या नियोजनात मेळावा संपन्न.









