१४ व १९ वर्षे वयोगटांत प्रथम क्रमांक; खेळाडू आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन
खेड : दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नवभारत हायस्कूल, भरणे येथे आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत शाळेच्या मुलांच्या संघाने १४ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटांत विजेतेपद पटकावले, तर १७ वर्षे वयोगटातील संघाने उपविजेतेपद मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सांघिक भावना, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.
या यशाबद्दल कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, खेड-मुंबईचे अध्यक्ष श्री. तु. ल. डफळे साहेब, सचिव श्री. वैराग साह








