• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

वाचन प्रेरणा दिनानिमित्त

RelatedPosts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल
कलाम आणि वाचन प्रेरणा दिन

    वाचनाने समृद्ध झालेले 'मिसाईल मॅन',वाचनाची आवड असणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,तरुण पिढीचे प्रेरणास्थान,पुस्तकांचे मित्र,माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ डॉ.अबुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांना त्यांच्या दि.१५ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
   महान शास्त्रज्ञ डॉ.अबुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांच्या या वाचनावरील प्रेमाचा आदर करण्यासाठी आणि इतरांनाही वाचनाची प्रेरणा मिळावी,

तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,म्हणून महाराष्ट्र शासनाने डॉ.कलाम यांचा १५ ऑक्टोंबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून २०१५ ला घोषित केला. तेव्हापासून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहाने साजरा केला जातो.
डॉ.कलाम यांचा जन्म दि.१५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. डॉ.कलाम यांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती आणि वाचनामुळेच त्यांचे जीवन समृद्ध झाले.
त्यांच्या अथांग ज्ञानामुळे आणि कार्याने त्यांनी जगामध्ये भारताचे नाव उंचावले.पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे आणि लोकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
“एक उत्तम पुस्तक हे शंभर चांगल्या मित्रांच्या बरोबरीचे असते.” हे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे अत्यंत प्रसिद्ध आणि प्रेरणादायी विचार आहेत. या डॉक्टर कलाम यांच्या विधानाचा अर्थ सांगता येईल की,”


पुस्तक हे निःस्वार्थी सोबतीचे खरे मार्गदर्शक असतात. एक चांगला मित्र आपल्याला नेहमी संकटात मदत करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. परंतु माणसांमध्ये स्वभावानुसार कधीतरी बदल होऊ शकतो किंवा मतभेद होऊ शकतात. याउलट, पुस्तक हे नेहमी स्थिर असते. ते आपल्याला कोणत्याही अपेक्षेविना ज्ञानाचा आणि योग्य मार्गाचा प्रकाश ।दाखविण्याचे कार्य करीत असते.१०० चांगले मित्र मिळून आपल्याला जेवढा अनुभव आणि ज्ञान देऊ शकतात, तेवढे समृद्ध ज्ञान आपल्याला एकाच चांगल्या पुस्तकातून मिळू शकते. पुस्तकात लेखकाच्या संपूर्ण आयुष्याचा अनुभव, विचार आणि संशोधन साठविलेले असते,जे वाचकाला प्रगती करण्यास मदत करते. पुस्तके ही कधीही तक्रार करत नाहीत किंवा आपली साथ सोडत नाहीत,जेव्हा आपण एकटे असतो किंवा निराश असतो, तेव्हा एक उत्तम पुस्तक वाचल्यास मनाला शांती आणि नवी ऊर्जा मिळते. ते कोणत्याही परिस्थितीत विश्वासू मित्राप्रमाणे आपल्या पाठीशी उभे राहते. माणसाच्या जीवनात चांगल्या मित्रांचे महत्त्व तर आहेच, पण एका उत्तम पुस्तकाचे स्थान त्याहूनही वरचे आहे, कारण ते आयुष्यभर माणसाला सुसंस्कृत, वैचारिकदृष्ट्या समृद्ध आणि यशस्वी बनवण्याचे काम करीत असतात.


वाचनाचे खूप फायदे आहेत. वाचन माणसाला सुसंस्कृत आणि विचारवंत बनविते.पुस्तके ही आपली सर्वात चांगली आणि खरे मित्र असतात, जी आपल्याला कधीही सोडून जात नाहीत.वाचनामुळे माणसाचा दृष्टिकोन बदलतो आणि ज्ञानात मोलाची भर पडते. नियमित वाचनामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते आणि भाषा अधिक प्रभावी होते. वाचन केल्याने मानवी मनाचा ताणतणाव कमी होतो आणि मानसिक शांतता लाभते. चांगली पुस्तके माणसाला संकटाच्या वेळी योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात. वाचनामुळे विचारांना चालना मिळते आणि माणसाची कल्पनाशक्ती अधिक विस्तारते.
“वाचाल तर वाचाल” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सुप्रसिद्ध विचार वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व अचूक अधोरेखित करतो.
या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
सर्व संस्थांमध्ये डॉ.ए
.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केल्या जाते.


विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांमध्ये या दिवशी विद्यार्थी वर्गात आवडती पुस्तके आणतात तसेच शाळेच्या ग्रंथालयातील विविध विषयावरील पुस्तके विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि विद्यार्थी त्यांचे सामूहिक वाचन करतात. शाळांमध्ये पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविले जाते, जेणेकरून मुलांना नवीन पुस्तकांची माहिती मिळेल.
निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि ग्रंथ दिंडी यांसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात राबवले जातात. उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शिक्षकांकडून पारितोषिक दिले जातात. अनेक ठिकाणी ‘पुस्तके भेट द्या’ अशी मोहिम राबवून ग्रंथालयांना पुस्तके दान केली जातात.आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटमुळे लोकांचे वाचनाकडील लक्ष कमी होत चालले आहे. अशा काळात ‘वाचन प्रेरणा दिन’ आपल्याला पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळण्याची आठवण करून देतो.
डॉ.कलाम यांचे स्वप्न होते की, भारतातील प्रत्येक नागरिकाने सुशिक्षित आणि ज्ञानी बनावे.
त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ अभ्यासाचीच नव्हे, तर अवांतर वाचनाचीही अत्यंत गरज आहे. चांगल्या पुस्तकांचे वाचन करून आपण एक सुजाण आणि प्रगतीशील समाज निर्माण करू शकतो. हा दिवस केवळ एका दिवसाचा उत्सव न राहता, वाचन ही आपली रोजची सवय बनली पाहिजे.
कथाकथनकार व लेखक व.पु.काळे म्हणतात की, “पुस्तकांइतका प्रामाणिक मित्र दुसरा कोणीही नाही.”वपुंच्या साहित्यात वाचनाचे महत्त्व अनेक ठिकाणी अधोरेखित केले आहे. ते मानत की, संकटाच्या किंवा एकटेपणाच्या काळात पुस्तके तुम्हाला कधीही सोडून जात नाहीत. ती तुम्हाला मार्ग दाखवतात, नवनवीन माणसांची ओळख करून देतात आणि मन शांत करतात.
साहित्यिक पु. ल. देशपांडे म्हणतात की,”वाचन म्हणजे केवळ अक्षरांची जुळवाजुळव नव्हे, तर दुसऱ्याच्या अनुभवातून स्वतः समृद्ध होण्याची प्रक्रिया आहे.” त्यांच्या मते चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने आपली विनोदबुद्धी, संवेदनशीलता आणि आकलनशक्ती वाढते. पुस्तके माणसाला संकुचित विचारांमधून बाहेर काढून जग कशारीतीने अनुभवावे हे शिकवतात.
आदर्श शिक्षक साने गुरुजी म्हणतात की,”ग्रंथ हेच आपले खरे गुरू आणि देव आहेत.” साने गुरुजींनी आपल्या ‘श्यामची आई’ आणि इतर साहित्यातून सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी वाचनाची गोडी निर्माण केली. बालपणापासूनच चांगली पुस्तके वाचल्यास मनावर उत्तम संस्कार होतात आणि चांगला समाज निर्माण होतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
वाचन कसे करावे आणि त्याचे महत्त्व काय याबद्दल जगातील अनेक महान विचारवंतांनी सुद्धा मोलाचे विचार मांडले आहेत. चांगल्या प्रकारे वाचन करण्यासाठी आणि वाचलेले आत्मसात करण्यासाठी त्यांचे दृष्टिकोन निश्चितच मार्गदर्शक ठरतात.
‘हाऊ टू रीड अ बुक’ (How to Read a Book) या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मोर्टिमर ॲडलट यांच्या मते, वाचन हे ‘सक्रिय’ (Active) असावे. केवळ डोळ्यांनी शब्द वाचणे म्हणजे वाचन नव्हे, तर वाचताना पुस्तकाशी आणि लेखकाच्या विचारांशी संवाद साधला पाहिजे. गरज पडल्यास पुस्तकावर स्वतःच्या नोंदी कराव्यात किंवा महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवावेत.


भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचनावर अफाट प्रेम होते. त्यांच्या मते, वाचन असे असावे जे माणसाला विचार करायला प्रवृत्त करेल आणि त्याचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करेल. त्यांनी “वाचाल तर वाचाल” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला, त्यांच्या मते, पुस्तकाचे वाचन माणसाला जीवनात सक्षम बनवते.
महात्मा गांधीजींच्या मते, ” भरपूर पुस्तके वाचण्यापेक्षा जी पुस्तके आपल्या हातात आहेत, ती एकाग्रतेने आणि समजून वाचणे जास्त महत्त्वाचे आहे. वाचलेल्या विचारांचे आचरण करणे हीच खऱ्या वाचनाची पावती आहे.
पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर थोडा वेळ विचार करा की लेखकाला नेमके काय सांगायचे आहे. केवळ एकाच प्रकारची पुस्तके न वाचता इतिहास, विज्ञान,कादंबऱ्या, आत्मचरित्रे अशा विविध विषयांचे वाचन करावे.
सारांश,”शरीराला जशी अन्नाची गरज असते, तशीच मेंदू आणि मनाला चांगल्या विचारांची गरज असते. ती वाचन संस्कृती वृद्धिंगत केल्याने प्राप्त होत असते.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण चांगली पुस्तके वाचण्याचा संकल्प करू या.
वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांना त्यांच्या दि.१५ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न
            पुरस्कार प्राप्त
          साहित्यिक व कवी   
 प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, 
  कांग्रेस नगर,अमरावती.
  भ्र. ध्व. : ८०८७७४८६०९

Ad 1
Previous Post

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत नवभारत हायस्कूलचे घवघवीत यश; दोन गटांत विजेतेपद, १७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद!

Next Post

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

Related Posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
0
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
Blog

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026
1
Blog

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026
4
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 16, 2026
3
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
Blog

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

October 16, 2026
1
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Next Post

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

ताज्या बातम्या

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In