दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे.. अशी मागणी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार भारत कवितके यांनी केली आहे.सध्या महाराष्ट्र राज्यातील महागाई,जल संकट, दुष्काळ या मुळे सर्व सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे.दसरा दिवाळी च्या तोंडावर सर्व सामान्य जनता हवालदिल झाली आहे,तेल, तूप,रवा, मैदा, साखर, डाळी,साबण या सारख्या उपयोगी वस्तू वस्त दरात शिधा वाटप दुकानतून शासनाने कराव्यात, जेणेकरून सर्व सामान्य माणसाची दसरा दिवाळी सुखकर जाईल, राज्यात दुष्काळ आणि महागाई चा राक्षस आ वासून उभा आहे, सर्व सामान्य जनता दसरा दिवाळी सण कसा साजरा करावा? या विचारानं त्रस्त आहे, शासनाने दसरा दिवाळी पूर्वी वेळेवर शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे, अशी मागणी पत्रकार भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केली आहे.









