निलंगा तालुका प्रतिनिधी श्री महेश मधुकरराव सरतापे –
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज युवानेते मा. श्री. अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब यांनी भगवानराव पाटील तळेगावकर,ऋषिकेश रमेशआप्पा कराड , कपिल माकणे,अबोली विनायकराव पाटील यांच्यासह मतदार वं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांचं माध्यम नसून, शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाचा भक्कम आधार आहे. या विश्वासाला न्याय देत शेतकऱ्यांचे हित, सभासदांचे अधिकार, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ठामपणे काम करण्याचा निर्धार…!
ही निवडणूक केवळ उमेदवारीची नाही, तर सहकार क्षेत्रात विश्वास, विकास आणि शेतकरीहिताला बळ देण्याची लढाई आहे….!
यावेळी महायुती घटक पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते…











