• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बलवडी फाटा येथे उसाच्या पहिल्या उचलीसाठी ५,५०० रुपयांची मागणी; अॅड. दीपक लाड व पंडित कोळेकर यांचे बेमुदत धरणे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लढा; आंदोलनस्थळी विटा, कुंडल व पलूस पोलिसांचा बंदोबस्त

सांगली : प्रतिनिधी

RelatedPosts

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची निवड

पाणीटंचाईचे संकट गडद; कुकडी, डिंभे आणि चासकमान धरणांतून आवर्तन सोडण्याची मागणी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या पहिल्या उचलीपोटी प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बलवडी फाटा (कुंडल) येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात अॅड. दीपक लाड व पंडित कोळेकर सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बलवडी फाटा येथे विटा, कुंडल आणि पलूस पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची गर्दी झाली असून, उसाच्या पहिल्या उचलीचा दर जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.

कारखाना प्रशासनासोबत बैठक घेण्याची मागणी

यावेळी अॅड. दीपक लाड म्हणाले, “ऊस आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्याऐवजी प्रशासनाने साखर कारखाना प्रशासनासोबत बैठक आयोजित करून उसाची पहिली उचल प्रतिटन ५,५०० रुपये तातडीने जाहीर करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.”

दरम्यान, आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. उसाला योग्य दर मिळेपर्यंत शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू राहणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित

या आंदोलनावेळी पत्रकार दिलीप पाटील, सचिन मगर, पंडित कोळेकर, किरण चव्हाण, मनोहर चव्हाण, मनोज जाधव, सचिन साळुंखे, विशाल कोंढाळकर, दास होनमाने, अमोल पवार, किरण पवार, विश्वास दुपटे, विजय दुपटे, बाळासो गुरव, योगेश पवार, आदित्य पवार, अनिकेत पवार, संदीप पवार, कपिल पवार, प्रतीक लोखंडे, राजेंद्र सावंत, तन्वेज पवार, तेजस पवार, सचिन पवार आणि अधिक पवार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ठिकाण : बलवडी फाटा, कुंडल

Ad 1
Tags: Dilip Patil
Previous Post

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

Related Posts

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन
ताज्या घडामोडी

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन

October 26, 2026
7
शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची निवड
ताज्या घडामोडी

शहादा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. नेत्रदीपक कुवर यांची निवड

October 26, 2026
11
पाणीटंचाईचे संकट गडद; कुकडी, डिंभे आणि चासकमान धरणांतून आवर्तन सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पाणीटंचाईचे संकट गडद; कुकडी, डिंभे आणि चासकमान धरणांतून आवर्तन सोडण्याची मागणी

October 25, 2026
12
गोठे रिकामे होण्याची वेळ; दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ
ताज्या घडामोडी

गोठे रिकामे होण्याची वेळ; दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ

October 25, 2026
24
आष्टी–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

आष्टी–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

October 25, 2026
51
पिराचीवाडी शाळेची माजी विद्यार्थिनी कुस्तीपटू शितल नेव्हारेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड!
ताज्या घडामोडी

पिराचीवाडी शाळेची माजी विद्यार्थिनी कुस्तीपटू शितल नेव्हारेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड!

October 25, 2026
3
Next Post
मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

ताज्या बातम्या

मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

October 26, 2026

बलवडी फाटा येथे उसाच्या पहिल्या उचलीसाठी ५,५०० रुपयांची मागणी; अॅड. दीपक लाड व पंडित कोळेकर यांचे बेमुदत धरणे आंदोलन

October 26, 2026
यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन

यवतमाळ जिल्ह्यात पाण्याचे काटेकोर नियोजन करा; जिल्हाधिकारी विकास मीना यांचे शेतकऱ्यांना आवाहन

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In