• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दसऱ्यानंतर मोखाडा परिसरात वाघदेवतेच्या पारंपरिक गीतांचा निनाद; मुलांकडून धान्य व बिदागी गोळा करून परंपरेचे जतन

मोखाडा : दसरा सण संपल्यानंतर चार ते पाच दिवसांनी ग्रामीण भागात आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक रूढी-परंपरांना सुरुवात होते. ‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’ या पारंपरिक सादेने मोखाडा परिसरातील गावोगावचा परिसर दुमदुमू लागला आहे. आधुनिक विज्ञानाच्या युगातही लहान मुले, मुली आणि महिला श्रद्धेने या परंपरा जपत असून, त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

RelatedPosts

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

दसऱ्यानंतर मुले गावोगावी फिरून पारंपरिक गीतांच्या माध्यमातून बिदागी मागतात. या वेळी ग्रामस्थांकडून त्यांना धान्य किंवा पैसे दिले जातात. त्यानंतर ठरलेल्या दिवशी वाघदेवतेला नैवेद्य अर्पण करून गोळा केलेल्या धान्यापासून जेवण तयार केले जाते. मुले एकत्र येऊन आनंदाने या भोजनाचा आस्वाद घेतात. या परंपरेतून सामूहिक सहभाग, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन घडते.

आदिवासी समाज हा निसर्गपूजक समाज म्हणून ओळखला जातो. त्यांच्या देवदेवतांमध्ये वाघदेवतेला विशेष महत्त्व आहे. पावसाळा संपून दिवाळीचे वेध लागल्यानंतर ग्रामीण भागात विविध रूढी-परंपरा सुरू होतात. या परंपरा पिढ्यान्‌पिढ्या श्रद्धेने पाळल्या जात असून, त्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.

विशेष म्हणजे, गावोगावी फिरून बिदागी मागण्याची पद्धत आणि त्यासाठी म्हटली जाणारी पारंपरिक गीते काही किलोमीटरच्या अंतरावरही बदललेली दिसतात. स्थानिक बोली, लोकश्रद्धा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसार या परंपरेला वेगवेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आधुनिकतेच्या प्रवाहातही मोखाडा परिसरातील मुले पारंपरिक गीतांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी नाते जपत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हा सांस्कृतिक वारसा आजही जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Ad 1
Tags: Nitish Mali
Previous Post

बिबट्याच्या दहशतीने भालगाव परिसरातून ऊसतोड कामगारांचे स्थलांतर!

Related Posts

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित
ताज्या घडामोडी

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

October 26, 2026
23
कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार
ताज्या घडामोडी

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

October 26, 2026
10
युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प
ताज्या घडामोडी

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

October 26, 2026
3
ताज्या घडामोडी

चारा टंचाईचे गंभीर संकट; पशुधनाची गणना झाली, पण चारा आणणार कुठून?

October 26, 2026
6
राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

राजधानी मराठी पत्रकार संघाच्या खटाव तालुका सचिवपदी नितीन पांडुरंग राठोड यांची नियुक्ती

October 26, 2026
1
खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय
ताज्या घडामोडी

खटाव तहसील कार्यालयातील वॉटर फिल्टर मशीन अनेक दिवसांपासून बंद; नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय

October 26, 2026
0

ताज्या बातम्या

‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर

‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर

October 26, 2026

बिबट्याच्या दहशतीने भालगाव परिसरातून ऊसतोड कामगारांचे स्थलांतर!

October 26, 2026
३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In