• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in Blog
0
उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

११.६५ लाख कोटींच्या सामंजस्य कराराबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची शासनाकडे मागणी

सोलापूर / प्रतिनिधी :

RelatedPosts

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!

बिबट्याच्या दहशतीने भालगाव परिसरातून ऊसतोड कामगारांचे स्थलांतर!

उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर, फ्लोटिंग सोलर, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज आणि अणुऊर्जा प्रकल्पांबाबतची अधिकृत माहिती व संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडे केली आहे. उजनी धरणाची जलसुरक्षा, पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेऊन या प्रकल्पांबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शासन आणि JW Global / The Seed Consortium यांच्यात सुमारे ११.६५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसंदर्भात झालेल्या सामंजस्य कराराच्या पार्श्वभूमीवर खासदार मोहिते-पाटील यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती मागवली आहे. संबंधित कंपनीची आर्थिक क्षमता, प्रकल्पांसाठी निधीची उपलब्धता, प्रस्तावित प्रकल्पांचे स्वरूप तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय परवानग्या आणि मंजुरींचा तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाणी, वीज वापर आणि पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न

प्रस्तावित प्रकल्पांसाठी किती पाणी आणि विजेची आवश्यकता असेल, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावर, स्थानिक पाणीपुरवठ्यावर आणि पर्यावरणावर कोणते परिणाम होऊ शकतात, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

तसेच, प्रकल्पांमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यास, पर्यावरणीय नुकसान झाल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. संभाव्य नुकसानीची भरपाई, विमा संरक्षण आणि स्थानिक नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी करारामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, हेही स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उजनीच्या जलसुरक्षेसाठी पारदर्शकतेची मागणी

उजनी धरण हे परिसरातील पाणीपुरवठा आणि विविध गरजांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने प्रस्तावित प्रकल्पांबाबतची माहिती लपवून न ठेवता ती पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, असे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

प्रकल्पांचे स्वरूप, आर्थिक व्यवहार, पाणी व वीज वापर, पर्यावरणीय परिणाम आणि संभाव्य जबाबदारी याबाबत अधिकृत कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकल्पांविषयी स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल. त्यामुळे शासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे उजनी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!
Blog

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026
1
बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!
Blog

बार्शीच्या मेघा व्हानकळस यांचा ‘बिग एक्स्पो २०२६’मध्ये गौरव!

October 26, 2026
10
Blog

बिबट्याच्या दहशतीने भालगाव परिसरातून ऊसतोड कामगारांचे स्थलांतर!

October 26, 2026
9
दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!
Blog

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

October 26, 2026
16
श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न
Blog

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

October 26, 2026
6
सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी
Blog

सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

October 26, 2026
12

ताज्या बातम्या

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In