• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 26, 2026
in Blog
0
दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा खासगी वित्तीय संस्थांना इशारा; शेतकरी आणि कर्जदारांना दिलासा

नांदेड : प्रतिनिधी

RelatedPosts

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. काशिनाथ दादा काळोखे; कार्याध्यक्षपदी सचिन आप्पा ताजणे यांची निवड

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुली करताना कोणत्याही प्रकारची सक्ती, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. स्मॉल फायनान्स, मायक्रोफायनान्स आणि इतर खासगी वित्तीय संस्थांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्जदारांशी सौजन्यपूर्ण व संवेदनशील वर्तन करणे आवश्यक आहे. कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वागणूक देणे, धमकावणे, हिंसाचार करणे किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा वापर करणे, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नियमबाह्य वसुली करणाऱ्या संस्थांवर कारवाई

कर्जवसुलीसाठी सिबिल (CIBIL) स्कोअर खराब करण्याची भीती दाखवून दबाव आणणे किंवा नियमबाह्य पद्धतींचा वापर करणे आढळल्यास संबंधित संस्थांविरुद्ध पोलीस आणि जिल्हा प्रशासनामार्फत कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये लागू कायदेशीर तरतुदींनुसार दंडात्मक तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देखरेखीचे निर्देश

तहसीलदार, सहाय्यक निबंधक आणि सहकार विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने वित्तीय संस्थांच्या कर्जवसुली प्रक्रियेवर नियमित लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत वसुली, कर्जदारांना धमकावणे किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने पडताळणी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

कर्जदारांच्या सन्मानाचे आणि हक्कांचे संरक्षण करा

कर्जवसुली करताना वित्तीय संस्थांनी लागू नियमांचे पालन करून कर्जदारांच्या सन्मानाचे आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या संस्थांविरुद्ध प्रशासन कठोर भूमिका घेणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

Related Posts

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न
Blog

श्रीगोंद्यात ‘संवाद विद्यार्थ्यांचा, निर्धार न्यायाचा’ मेळावा उत्साहात संपन्न

October 26, 2026
4
सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी
Blog

सपकाळवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

October 26, 2026
6
श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. काशिनाथ दादा काळोखे; कार्याध्यक्षपदी सचिन आप्पा ताजणे यांची निवड
Blog

श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. काशिनाथ दादा काळोखे; कार्याध्यक्षपदी सचिन आप्पा ताजणे यांची निवड

October 26, 2026
1
गुरूंच्या ज्ञानाचा आदर हीच खरी गुरुसेवा : संजय साबळे
Blog

गुरूंच्या ज्ञानाचा आदर हीच खरी गुरुसेवा : संजय साबळे

October 26, 2026
8
ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत
Blog

ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत

October 26, 2026
9
मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!
Blog

मालेगाव जहागीरमध्ये कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उत्सवाचा उत्साह!

October 26, 2026
3
Next Post
युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

ताज्या बातम्या

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रा. डॉ. प्रमोद गारोडे यांचा सपत्नीक सत्कार

October 26, 2026
युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

युवापिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी ‘हर घर गुरमत’ मिशनचा संकल्प

October 26, 2026
दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

दुष्काळात कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कठोर कारवाई!

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In