• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरला, तर घोड धरणाचे १० नोव्हेंबरला सुटणार!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 28, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

रब्बी हंगामाला दिलासा; नवीन चारा तयार होईपर्यंत पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्याची आमदार विक्रम पाचपुते यांची जलसंपदामंत्र्यांकडे मागणी

श्रीगोंदा | प्रतिनिधी

RelatedPosts

मेहकर-लोणार मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून ‘दिवाळीचा आनंदाचा शिधा’ दाखल!

बालकांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी

५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माउंट कॉन्व्हेंटचा यशाचा झेंडा!

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुकडी कालव्याचे आवर्तन ५ नोव्हेंबर २०२६ रोजी, तर घोड धरणाचे आवर्तन १० नोव्हेंबर २०२६ रोजी शेतीसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. या आवर्तनांमुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

चारा पिकांसाठी पाण्याचे नियोजन करा

शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच श्रीगोंदा तालुक्यातील पशुधनासाठी निर्माण झालेल्या चारा टंचाईकडेही आमदार विक्रम पाचपुते यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. सध्या तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने त्यांनी जलसंपदामंत्र्यांना पत्र देऊन विशेष पाणी नियोजन करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना नव्याने चारा पिकांची लागवड करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यास काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नवीन चारा पूर्णपणे तयार होईपर्यंत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पाण्याचे विशेष आणि दीर्घकालीन नियोजन करावे, अशी आग्रही मागणी आमदार पाचपुते यांनी पत्राद्वारे केली आहे.

शेतकरी आणि दूध उत्पादकांमध्ये अपेक्षा

रब्बी हंगामासाठी पाण्याच्या आवर्तनाबाबत केलेला पाठपुरावा आणि पशुधनाच्या चारा प्रश्नाकडे वेळीच लक्ष वेधल्यामुळे शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध होण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्याप्रति शेतकरी वर्गातून आभार व्यक्त केले जात आहेत. आता जाहीर वेळापत्रकानुसार आवर्तने सुरू होऊन शेती आणि पशुधनासाठी पाण्याचे योग्य नियोजन होण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

काळ्या मातीतील पिके करपली; खडकावरील निवडुंगाने दिला जगण्याचा ‘महामंत्र’!

Next Post

मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील पथदिवे अखेर सुरू; राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

Related Posts

मेहकर-लोणार मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून ‘दिवाळीचा आनंदाचा शिधा’ दाखल!
Blog

मेहकर-लोणार मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून ‘दिवाळीचा आनंदाचा शिधा’ दाखल!

October 28, 2026
0
बालकांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी
Blog

बालकांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी

October 28, 2026
5
५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माउंट कॉन्व्हेंटचा यशाचा झेंडा!
Blog

५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माउंट कॉन्व्हेंटचा यशाचा झेंडा!

October 28, 2026
25
हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान
Blog

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

October 27, 2026
46
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम
Blog

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

October 27, 2026
3
मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात
Blog

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

October 27, 2026
25
Next Post
मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील पथदिवे अखेर सुरू; राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील पथदिवे अखेर सुरू; राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील पथदिवे अखेर सुरू; राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील पथदिवे अखेर सुरू; राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

October 28, 2026

कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरला, तर घोड धरणाचे १० नोव्हेंबरला सुटणार!

October 28, 2026
काळ्या मातीतील पिके करपली; खडकावरील निवडुंगाने दिला जगण्याचा ‘महामंत्र’!

काळ्या मातीतील पिके करपली; खडकावरील निवडुंगाने दिला जगण्याचा ‘महामंत्र’!

October 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In