• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

हर्षवर्धन कदमची दैदीप्यमान कामगिरी; ३१६ किलो वजन उचलून पटकावले सुवर्णपदक

कुरुंदवाड | प्रतिनिधी

RelatedPosts

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

दिवसभर वृत्तपत्र विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे वडील, मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करणारे आई-वडील आणि त्यांच्या कष्टांना यशाची सुवर्णझळाळी देणारा मुलगा! पेपर विक्रेते दिगंबर बापूसो कदम यांचा मुलगा हर्षवर्धन कदम याने वेटलिफ्टिंग स्पर्धेत तब्बल ३१६ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. वडिलांच्या कष्टाचे आणि कुटुंबाच्या त्यागाचे चीज करणाऱ्या या यशामुळे कदम कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, हर्षवर्धनच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील सहकारभूषण डॉ. एस. के. पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हर्षवर्धनने गुजरात येथे झालेल्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२६-२७ मध्ये आपल्या ताकदीची आणि जिद्दीची चमक दाखवली. स्नॅच प्रकारात १४५ किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात १७१ किलो असे एकूण ३१६ किलो वजन उचलून त्याने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयासह कुरुंदवाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हर्षवर्धनच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, सरावातील सातत्य आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आहे. येथील हर्क्युलस जिममध्ये प्रदीप पाटील आणि अविनाश टारे यांनी त्याला प्रशिक्षण देऊन घडवले. शिस्त, जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

विशेष म्हणजे, हर्षवर्धनचे वडील दिगंबर बापूसो कदम हे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजच्या कष्टातून मुलाच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या वडिलांच्या मेहनतीचे चीज हर्षवर्धनने सुवर्णपदकाच्या रूपाने केले आहे. एका कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरातून आंतरविद्यापीठीय स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचलेला त्याचा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हर्षवर्धनच्या या यशात आई-वडील आणि आजी-आजोबा यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. तसेच महाविद्यालयाचे प्रा. सुनील चव्हाण, नगरसेवक विजय पाटील आणि योगिनी पाटील यांचेही सहकार्य लाभले.

हर्षवर्धनच्या या सुवर्णकामगिरीमुळे कष्ट, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

November 16, 2026
0
रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026
15
पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?
ताज्या घडामोडी

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
35
आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
3
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर
ताज्या घडामोडी

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
23
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा
ताज्या घडामोडी

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026
55

ताज्या बातम्या

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

November 16, 2026

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

November 16, 2026
रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In