• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

भीषण आगीत सुमारे ५० लाखांचे नुकसान; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

रत्नागिरी | प्रतिनिधी

RelatedPosts

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

कोकणात अलीकडच्या काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी पहाटे रत्नागिरी शहरातील श्री महालक्ष्मी मिनी मॉलला लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात टेक्नो सर्व्हिसेस कंपनीला भीषण आग लागून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास टेक्नो सर्व्हिसेस कंपनीला आग लागल्याचे निदर्शनास आले. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिक आणि उपस्थितांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीचे मालक मनीष आपटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंबही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने कंपनीतील साहित्य आणि संपूर्ण कंपनी जळून भस्मसात झाली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवाळीच्या काळात रत्नागिरी परिसरात घडलेल्या या सलग आगीच्या घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Ad 1
Tags: Dr. Prashant Paranjape
Previous Post

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

Related Posts

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?
ताज्या घडामोडी

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
3
आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या घडामोडी

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
3
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर
ताज्या घडामोडी

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
4
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा
ताज्या घडामोडी

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026
0
शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
ताज्या घडामोडी

शेतरस्ता पीडितांसाठी शेवगाव तहसील कार्यालयात ‘जन न्याय दिन’; दर महिन्याला उपक्रम राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

November 15, 2026
2
माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते शंकरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

November 15, 2026
4

ताज्या बातम्या

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

रत्नागिरीत आगीचा हाहाकार; मिरजोळे एमआयडीसीतील टेक्नो सर्व्हिसेस कंपनी भस्मसात

November 15, 2026
पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

पोल्ट्री व्यवसायाला येणार ‘सोन्याचे दिवस’?

November 15, 2026
आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In