• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

वेतनश्रेणीतील सुधारणा आणि समान कामासाठी समान वेतनाची मागणी; मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा कर्मचारी संघटनांचा इशारा

पंढरपूर | प्रतिनिधी :

वेतनश्रेणीतील सुधारणांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबरपासून सुरू केलेला बेमुदत संप मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर १८ नोव्हेंबर रोजी तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RelatedPosts

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम

या संपात पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. कामानिमित्त न्यायालयात आलेले वकील, पक्षकार आणि नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, तसेच समान कामासाठी समान वेतन लागू करावे, या प्रमुख मागण्या कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहेत. याशिवाय विविध प्रलंबित मागण्यांबाबतही कर्मचाऱ्यांनी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होतो का, याकडे राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

त्यामुळे २६ नोव्हेंबरच्या बैठकीत होणाऱ्या चर्चेकडे न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि पक्षकारांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Bhagyashri Gaikwad
Previous Post

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

Next Post

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

Related Posts

ताज्या घडामोडी

2
अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम
ताज्या घडामोडी

अशोकजी सिंगल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ममदापूर येथे विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचा कार्यक्रम

November 19, 2026
2
राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून सर्व सहकार्य : बंदरे मंत्री नितेश राणे
ताज्या घडामोडी

राज्यातील बंदरांच्या विकासासाठी शासनाकडून सर्व सहकार्य : बंदरे मंत्री नितेश राणे

November 19, 2026
4
ताज्या घडामोडी

कळंब तालुक्यात भूजलपातळी घटली; शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली

November 19, 2026
9
दापोली तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला; संस्कार श्रावणपाटील यांना राज्यस्तरीय लाठी-काठी पुरस्कार
ताज्या घडामोडी

दापोली तालुक्याचा नावलौकिक राज्यस्तरावर उंचावला; संस्कार श्रावणपाटील यांना राज्यस्तरीय लाठी-काठी पुरस्कार

November 19, 2026
26
Next Post

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

ताज्या बातम्या

कार्तिकी वारीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश

November 19, 2026

पंढरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित; २६ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष

November 19, 2026
कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

कार्तिकी वारी : संतपरंपरा, भक्ती आणि वारकरी संप्रदायाचा अखंड प्रवास

November 19, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In