• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

विद्युत तारांच्या घर्षणातून ठिणग्या पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता

सातेफळ | प्रतिनिधी :

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सातेफळ येथे उसाच्या शेताला भीषण आग लागून शेतकरी संजीवन कांदे यांचा सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाला. शेतातील विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

RelatedPosts

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

उसाच्या फडाला लागलेली आग एवढी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि वर्षभर कष्ट करून उभे केलेले ऊसपीक डोळ्यादेखत जळून खाक झाले.

आपले पीक वाचवण्यासाठी शेतकरी संजीवन कांदे यांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात ते भाजले गेले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना पाच एकर ऊस जळाल्याने संजीवन कांदे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेमुळे सातेफळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Ad 1
Previous Post

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Related Posts

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026
6
जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026
2
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा
ताज्या घडामोडी

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
6
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
3
पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी
ताज्या घडामोडी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
29
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026
15

ताज्या बातम्या

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026
जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In