• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

पूज्य भंते बी. संघपालजी महाथेरो व भंते श्रद्धापालजी यांचे मार्गदर्शन; बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन

आलेगाव | प्रतिनिधी : आलेगाव येथे पूज्य भंते बी. संघपालजी महाथेरो आणि पूज्य भंते श्रद्धापालजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मप्रवचनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना सदाचाराचा संदेश देत बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

पत्रकार मंगल आनंदा तेलगोटे यांच्या घरी कु. अन्वी मंगल तेलगोटे हिचा पाचवा वाढदिवस शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी धम्ममय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दोन्ही पूज्य भंते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी दोन्ही भंते यांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनाने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. महिलांनी पारंपरिक पद्धतीने सुंदर रांगोळ्या काढून आणि फुलांचा वर्षाव करून दोन्ही पूज्य भंते यांचे स्वागत केले.

त्यानंतर पूज्य भंते यांनी परित्राण पाठ घेतला आणि भोजनदानाचा स्वीकार केला. भोजनदानानंतर त्यांनी उपस्थितांना धम्मप्रवचनातून मार्गदर्शन केले.

प्रवचनात भंते यांनी सांगितले की, माणसाच्या जीवनातील सुख आणि दुःख हे त्याच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. आपल्या सुख-दुःखाला दुसरे कोणीही जबाबदार नसून, आपण केलेल्या कर्मांचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. कुशल कर्म केल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतात, तर अकुशल आणि वाईट कर्म केल्यास त्याचे परिणामही वाईटच मिळतात.

भगवान गौतम बुद्ध हे मानवजातीला योग्य मार्ग दाखवणारे मार्गदाते आहेत. त्यामुळे प्रत्येकाने बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर श्रद्धा ठेवून सदाचाराचा मार्ग स्वीकारावा, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. तसेच समता, बंधुता, प्रज्ञा, करुणा, मैत्री, शांती आणि मानवतेचे महत्त्वही पटवून दिले.

यावेळी गावातील बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका, नातेवाईक आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भंते यांना दान देऊन पुण्यसंचय केला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रवीण शिरसाट (बौद्धाचार्य) यांनी केले. कु. अन्वीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून केवळ आनंदोत्सव न साजरा करता बुद्धांच्या विचारांचा आणि धम्मसंस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

Next Post

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

Related Posts

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
0
पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी
ताज्या घडामोडी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
2
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026
3
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
ताज्या घडामोडी

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

November 22, 2026
1
कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

November 22, 2026
2
सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा
ताज्या घडामोडी

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

November 22, 2026
16
Next Post
केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

ताज्या बातम्या

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

केलेले दान आणि भजन नेहमी गुप्त असावे – प. पू. मीरा अलकाश्रीजी

November 22, 2026
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In