• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

नियमबाह्य वाद्यांना मनाई; मंडळांना एक दिवस आधी वाद्य वाजवून दाखवावे लागणार

उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या शांतता बैठकीत कडक सूचना

श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शासन आणि न्यायालयाच्या आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत, केवळ शासनमान्य पारंपरिक वाद्यांना परवानगी असलेल्या मिरवणुकांनाच मंजुरी दिली जाईल, असा कडक इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांनी दिला.

RelatedPosts

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

माहूर शहरातील सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये यापूर्वी डीजे आणि मानवी शरीराला हानिकारक ठरू शकणारी इतर वाद्ये वाजविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, शासन आणि न्यायालयाच्या आदेशांनुसार केवळ परवानगी असलेली वाद्येच वाजविणे बंधनकारक असल्याचे भोंडवे यांनी स्पष्ट केले.

मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनी शपथपत्रासह अर्ज सादर करावा. तसेच मिरवणुकीत वाजविण्यात येणारे वाद्य एक दिवस आधी पोलीस प्रशासनासमोर वाजवून दाखवावे लागेल. त्यानंतरच नियमानुसार मिरवणुकीला परवानगी देण्यात येईल. नियमबाह्य वाद्ये वाजविल्यास संबंधित मंडळांची भविष्यातील मिरवणुकीची परवानगी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीला पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके, भाजपचे डॉ. निरंजन केशवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, शिंदे सेनेचे विनोद पाटील सूर्यवंशी, एमआयएमचे तालुकाध्यक्ष सज्जाद शेख, इर्शाद मकरानी, शेख मोसिन, गोपनीय शाखेचे गजानन जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Ad 1
Tags: Jaykumar Adkine
Previous Post

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

Next Post

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

Related Posts

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
0
सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

सातेफळ येथे शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ऊस जळून खाक

November 22, 2026
1
कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम
ताज्या घडामोडी

कापूस आयातीवर २० टक्के शुल्क लावा; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला दहा दिवसांचा अल्टिमेटम

November 22, 2026
1
कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

कणकोरीत मंदिर ते स्मशानभूमी मार्गावर विद्युत खांब उभारणीच्या कामाला सुरुवात

November 22, 2026
2
सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा
ताज्या घडामोडी

सांगलीतील कांदा व्यापाऱ्याला १२.७२ लाखांचा गंडा; तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा

November 22, 2026
16
बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या
ताज्या घडामोडी

बोळींज क्रीडा संकुलाला ‘नरवीर चिमाजी अप्पा’ यांचे नाव द्या

November 21, 2026
8
Next Post
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

दुष्काळाच्या छायेतही संस्कृती जपली; येळपणे येथे सांगळे बंधूंनी घातले गायीचे अनोखे डोहाळे जेवण

November 22, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In